धाराशिव जिल्ह्यात अवैध मद्य विरोधी पाच ठिकाणी कारवाई
धाराशिव :- पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी, अपर पोलीस अधीक्षक श्री. गौहर हसन यांच्या मार्गदर्शनाखाली काल सोमवार दि.25.12.2023 रोजी अवैध मद्य विरोधी विशेष मोहिम राबवण्यात आली. या मोहिमेदरम्यान 08 कारवाया करण्यात आल्या. या छाप्यात घटनास्थळावर आढळलेला सुमारे 2,060 लि. गावठी दारु कनर्मीतीचे गुळमिश्रीत रासायनिक द्रव व 102 लि. गावठी दारु, देशी विदेशी दारुच्या 100 सिलबंद बाटल्या असे मद्य जप्त करण्यात आले. सदर मद्य जप्त करुन यांची एकत्रीत किंमत अंदाजे 2,10,240 ₹ आहे. यावरुन महाराष्ट्र मद्य मनाई कायद्यांतर्गत संबंधीत पोलीस ठाण्यात 08 गुन्हे खालीलप्रमाणे नोंदवण्यात आले आहेत.
1)कळंब पो. ठाणेच्या पथकाने 3 ठिकाणी छापे टाकले. आरोपी नामे-रेखा अरुण शिंदे, वय 33 वर्षे, रा.मोहा पारधीपिडी कळंब ता. कळंब जि. धाराशिव या 13.10 वा. सु. मनुष्यबळ पाटीकडे जाणारे रोडचे लगत अंदाजे 47,400 किंमतीचे 790 लि. गावठी दारु निर्मीतीचे गुळमिश्रीत रासायनिक द्रव जप्त करण्यात आले. तर आरोपी नामे- रोहन राजेश पाटील, वय 23 वर्षे, 2) मुजीब शाहजान पठाण, वय 32 वर्षे, रा. ईटकुर मांडवा, ता. वाशी, जि. धाराशिव हे 17.10 वा. सु. डॉ. बाबासाहेब उद्यानासमोर कळंब येथे अंदाजे 59,580 किंमतीच्या देशी विदेशी दारुच्या 88 सिलबंद बाटल्या जप्त करण्यात आल्या. तर आरोपी नामे- सत्वशिला विलास काळे, वय 55 वर्षे, रा. मरसा खं ता. कळंब जि. धाराशिव या 18.15 वा. सु. आपल्या राहात्या घरासमोर अंदाजे 50,400 किंमतीचे 840 लि. गुळमिश्रीत रासानिक द्रव जप्त करण्यात आले.
2)उमरगा पो. ठाणेच्या पथकाने 2 ठिकाणी छापे टाकले. आरोपी नामे- गोविंद बळीराम चव्हाण, वय 37 वर्षे, रा. कोळी वाडा उमरगा ता. उमरगा जि. धाराशिव हे 19.15 वा. सु. आझाद चौक उमरगा येथे अंदाजे 43,300 किंमतीचे 430 लि. गावठी दारु निर्मीतीचे गुळमिश्रीत रासायनिक द्रव जप्त करण्यात आले. तर आरोपी नामे- सोजराबाई अनिल शिंदे, वय 41 वर्षे, रा. तुरोरी ह.मु. कोरेगाववाडी ता. उमरगा या 17.30 वा. सु. कोरेगाववाडी येथे राहते घरासमोर अंदाजे 4,200 किंमतीची 40 गावठी दारु जप्त करण्यात आली.
3)बेंबळी पो. ठाणेच्या पथकाने ठिकाणी छापा टाकला. आरोपी नामे- सिकंदर बाबु काळे, वय 60 वर्षे, रा. बेंबळी ता. जि. धाराशिव हे 18.00 वा. सु. खंडोबा मंदीराजवळ बेंबळी येथे अंदाजे 2,000 किंमतीची 20 लि. गावठी दारु जप्त करण्यात आली.
4)आंनदनगर पो. ठाणेच्या पथकाने छापा टाकला. आरोपी नामे- मारुती बापू शिंदे, वय 37 वर्षे, रा. दत्तनगर तेरणा कॉलेज जवळ धाराशिव ता. जि. धाराशिव हे 19.15 वा. सु. जरीया हॉटेलच्या बाजूस बोळात धाराशिव येथे अंदाजे 3,360 किंमतीची 42 लि. गावठी दारु जप्त करण्यात आली.
5)येरमाळा पो. ठाणेच्या पथकाने छापा टाकला. आरोपी नामे- संगीता रामभाउ जाधवर, वय 50 वर्षे, रा. वडजी, ता. वाशी जि. धाराशिव या 18.30 वा. सु. वडजी येथे अंदाजे 890 किंमतीच्या देशी विदेशी दारुच्या 12सिलबंद बाटल्या जप्त करण्यात आल्या.