अवैध मद्य विरोधी धाराशिव जिल्ह्यात सात ठिकाणी कारवाई
धाराशिव : पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी, अपर पोलीस अधीक्षक गौहर हसन यांच्या मार्गदर्शनाखाली काल रविवार दि.24.03.2024 रोजी अवैध मद्य विरोधी विशेष मोहिम राबवण्यात आली. या मोहिमेदरम्यान 07 कारवाया करण्यात आल्या. या छाप्यात घटनास्थळावर आढळलेला सुमारे 150 लि. गावठी दारु निर्मीतीचे गुळमिश्रीत रासायनिक द्रव, 20 लि. गावठी दारु, सिंधी ताडी 40 व देशी विदेशी दारुच्या 24 सिलबंद बाटल्या असे मद्य जप्त करण्यात आले. सदर मद्य व कार जप्त करुन त्यांची एकत्रीत किंमत अंदाजे 15,340 ₹आहे.यावरुन महाराष्ट्र मद्य मनाई कायद्यांतर्गत संबंधीत पोलीस ठाण्यात 07 गुन्हे खालीलप्रमाणे नोंदवण्यात आले आहेत.
1)कळंब पो.ठाणेच्या पथकाने 4 ठिकाणी छापे टाकले. आरोपी नामे-अनिल रोहीदास गाडे, वय 52वर्षे, रा. आंदोरा ता. कळंब, जि. धाराशिव हे 12.50 वा. सु. हॉटेल गारवा चे पाठीमागे आंदोरा येथे अंदाजे 770 ₹ किंमतीच्या देशी विदेशी दारुच्या 11 सिलबंद बाटल्या जप्त करण्यात आल्या. आरोपी नामे- लक्ष्मण रंगा शिंदे, वय 60 वर्षे, रा. चवाळी पारधी पीडी वाकडी के. ता. कळंब जि. धाराशिव हे 19.00 वा. सु. आपल्या पत्रयाचे शेड समोर अंदाजे 7,500 ₹ किंमतीचे 150 लि. गावठी दारु निर्मीतीचे गुळमिश्रीत रासायनिक द्रव जप्त करण्यात आले. आरोपी नामे-संजय ज्ञानोबा सोनवणे, वय 45 वर्षे, रा. ब्रम्हाचीवाडी ता. कळंब, जि. धाराशिव हे 18.10 वा. सु. मोहेकर ॲग्रो इंडस्ट्रियल जवळ हॉटेल महाराष्ट्रच्या समोर मोहा शिवार येथे अंदाजे 700 ₹ किंमतीच्या देशी विदेशी दारुच्या 10 सिलबंद बाटल्या जप्त करण्यात आल्या. आरोपी नामे-अनिल रोहीदास गाडे, वय 52 वर्षे, रा. भाटसांगवी ता. कळंब, जि. धाराशिव हे 19.30 वा. सु. अन्नपुर्ण हॉटेल शेजारी कळंब शिवार अथर्डी रोड अंदाजे 570 ₹ किंमतीच्या देशी विदेशी दारुच्या 3 सिलबंद बाटल्या जप्त करण्यात आल्या.
2)धाराशिव ग्रामीण पो.ठाणेच्या पथकाने 2 ठिकाणी छापे टाकले. आरोपी नामे-सुमन दशरथ चांदणे, वय 58 वर्षे, रा. देवळाली ता. जि. धाराशिव या 13.30 वा. सु. आपल्या राहात्या घरासमोर अंदाजे 950 ₹ किंमतीची 10 लि. गावठी दारु जप्त करण्यात आली. आरोपी नामे- अंजली दत्तात्रय पवार, वय 40 वर्षे, रा. येडशी ता.जि. धाराशिव हे 19.20 वा. सु. भवानी चौक येडशी येथे अंदाजे 650 ₹ किंमतीची 10 लि. गावठी दारु जप्त करण्यात आली.
3)उमरगा पो.ठाणेच्या पथकाने 1 ठिकाणी छापा टाकला. आरोपी नामे-राजेंद्र अंगत कांबळे, वय 46 वर्षे, रा. एकुरगा ता. उमरगा जि. धाराशिव हे 20.00 वा. सु. गुळ कारखाना शेड समोर एकुरगा रोडचे बाजूला अंदाजे 4,200 ₹ किंमतीची 40 लि. सिंधी ताडी अम्ली द्रव जप्त करण्यात आले.