मराठा समाजाला आरक्षण देणे केंद्र सरकारच्याच हातात केंद्र सरकारने 50 टक्के आरक्षणाच्या पुढचा कायदा करत आरक्षण द्यावे ठाकरे गटाचे खासदार ओमराजे निंबाळकर यांची मागणी

0
बातमीचा व्हिडिओ पाहण्यासाठी निळा रंगाच्या अक्षरांना टच करा...


मनोज जरांगे यांच्या भेटीला जाणारी नाटकी मंडळी असल्याचीही टीका

Dharashiv :  संसदेने कायदा केल्याशिवाय व आरक्षणाची मर्यादा 50 टक्केच्या पुढे वाढवून आरक्षण दिल्याशिवाय मराठा समाजाला आरक्षण मिळू शकत नसल्याचे मत धाराशिव चे ठाकरे गटाचे खासदार ओमराजे निंबाळकर यांनी व्यक्त केले. मी केंद्राकडे या पूर्वी 6 वेळा मागणी केली आहे आणि आताही केंद्राकडे तीच मागणी करत असून केंद्र सरकारने यापूर्वीच जर आरक्षणाची मर्यादा वाढवून आरक्षण दिले असते तर ओबीसी-मराठा हा वाद निर्माण झाला नसता तरी देखील आता वेळ गेली नसून केंद्र सरकारने आरक्षणाबाबतीत कायदा करून आरक्षण द्यावे अशी मागणी धाराशिव चे खासदार ओमराजे निंबाळकर यांनी केली तसेच सत्ताधारी मंडळी मनोज जरांगे पाटील यांच्या भेटीला जात आहेत ज्यांनी त्यांना विरोध केला तेच भेटायला जात असून ती नाटकी मंडळी असल्याची टीकाही ओमराजे निंबाळकर यांनी केली आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा (0)
To Top