चिखली (ता. धाराशिव):
आगामी जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर चिखली (ता. धाराशिव) येथे पदाधिकारी व कार्यकर्त्यांची आढावा व नियोजन बैठक आमदार कैलास घाडगे-पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडली.
या बैठकीत आगामी निवडणुकांसाठीची रणनीती, बूथनिहाय आढावा, संघटनात्मक मजबुती तसेच प्रभावी प्रचारयंत्रणा उभारण्याबाबत सविस्तर व ठोस चर्चा करण्यात आली. प्रत्येक बूथवर सक्षम व जबाबदार टीम उभी करून मतदारांशी थेट संवाद वाढवावा, असे आवाहन आमदार कैलास घाडगे-पाटील यांनी यावेळी केले.
कार्यकर्त्यांनी मतभेद विसरून एकजुटीने, समन्वयाने व शिस्तबद्ध पद्धतीने प्रचारक म्हणून मैदानात उतरावे. संघटनेच्या ताकदीवर आणि जनतेच्या विश्वासावर शिवसेनेचे उमेदवार मोठ्या मताधिक्याने विजयी करण्यासाठी प्रामाणिक प्रयत्न करावेत, असेही आवाहन यावेळी करण्यात आले.
या बैठकीस सांजा जिल्हा परिषद गटातील प्रमुख पदाधिकारी, शिवसैनिक व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. आगामी निवडणुकांच्या दृष्टीने संघटन अधिक मजबूत करण्यासाठी सर्वांनी जबाबदारीने काम करण्याचा निर्धार यावेळी व्यक्त करण्यात आला.


