अजुन 17 ऑक्टोबर पर्यंत वीजेच्या कडकडाटासह मुसळधार पावसाच्या शक्यता , प्रशासकीय यंत्रणांना सतर्कतेचा ईशारा

0


महाराष्ट्र :-  भारतीय हवामान विभागाने दिलेल्या ईशान्यानुसार दि . 13.10.2020 ते 17.10.2020 या कालावधीत राज्यात वीजेच्या कडकडाटासह मुसळधार पावसाची शक्यता वर्तविली आहे . विशेषतः किनारपट्टीलगतच्या सर्व जिल्ह्यामध्ये वीजेच्या कडकडाटासह मुसळधार ते अतिमुसळधार पावसाची शक्यता वर्तविण्यात आलेली आहे . या कालावधीमध्ये जिल्हा पातळीवरून सर्व प्रशासकीय यंत्रणांना सतर्कतेचा ईशारा देण्याबाबतच्या सुचना तात्काळ देण्यात याव्यात असे पत्र महाराष्ट्र शासनाच्या वतीने काढण्यात आले आहे . जेणे करून मनुष्य हानी टाळता येणे शक्य होईल .असे महाराष्ट्र शासनाने या पत्रात नमुद केले आहे.

13 ऑक्टोबर पासून महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यांमध्ये पाऊस सुरू झाला आहे अनेक ठिकाणी छोट्या गावांचा संपर्क तुटला आहे व त्या संदर्भात ग्रामीण भागातील सोशल माध्यम वापरणाऱ्या नागरिकांनी आपल्या सोशल माध्यमांच्या अकाऊंटवरुन ही माहिती विविध सोशल अकाउंटवर अपलोड केली आहे.

उस्मानाबाद जिल्ह्यात देखील 13 ऑक्टोबर पासून जोरदार व मध्यम स्वरूपाचा पाऊस सुरू आहे  व परंडा तालुक्यातील काळेवाडी तलावास वरच्या बाजूला भेगा पडल्यामुळे धोकादायक परिस्थिती असल्याने तेथे प्रशासन मोठ्या प्रमाणात उपाययोजना राबवत आहे व जिल्हा प्रशासनाने जिल्ह्यातील नागरिकांना सुरक्षित राहण्याचे आवाहन केले आहे. 

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा (0)
To Top