मांजरा धरणात 94.51% जलसाठा कोणत्याही क्षणी दरवाजे उघडण्याची शक्यता !
लातुर :- मांजरा धरणात शुक्रवारी सकाळ पर्यंत 94.51% जलसाठा उपलब्ध झाला आहे. सध्या पाण्याची आवक मंदावली असली तरी एखादा मोठा पाऊस पडल्यास धरण कोणत्याही क्षणी 100% भरू शकते. त्यानंतर धरणाचे दरवाजे उघडावे लागू शकतात.
त्यामुळे मांजरा नदीकाठावरील शेतकरी, ग्रामस्थांनी सतर्क रहावे. नदीपाञात पोहणे, नदीकाठावर जनावरे चारणे, पूर पाहायला जाणे असे प्रकार टाळावेत. अर्थिकहानी, जिवितहानी होणार नाही याची काळजी घ्यावी असे आवाहान लातुर जिल्हाधिकारी जी श्रीकांत यांनी फेसबुक पेजच्या माध्यमातून केले आहे.