google.com, pub-1406548548385211, DIRECT, f08c47fec0942fa0 उस्मानाबाद मध्ये ऑनलाईन 96 हजार 997 रुपयांची फसवणूक !

उस्मानाबाद मध्ये ऑनलाईन 96 हजार 997 रुपयांची फसवणूक !

0



उस्मानाबाद जिल्ह्यातील पोलीस ठाणे, येरमाळा येथे अविनाश नवनाथ वाघमारे, रा. बाभळगांव, ता. कळंब यांना दि. 11.10.2020 रोजी 09.15 वा. सु. एका अनोळखी मोबाईल क्रमांकावरुन कॉल आला की, “फोन पे हेड ऑफिस मधुन बोलत आहे, तुमचा 7,000/-रु. चा रिवार्ड कंपनीकडून पाठवला आहे, तो स्विकारण्यासाठी नोटीफिकेशन तपासुन पे करा.” असे सांगुण अविनाश वाघमारे यांना त्या फोनवरील व्यक्तीने बोलते ठेवले. यावर अविनाश वाघमारे यांना आलेले ओटीपीचे संदेश त्यांनी वाचून खात्री न करता फोनवर बोलणाऱ्या समोरील व्यक्तीस पुन्हापुन्हा सांगीतल्याने त्या अनोळखी मोबाईल क्रमांकाच्या व्यक्तीने अविनाश वाघमारे यांच्या बँक खात्यातील एकुण 96,997/-रु. टप्प्याटप्प्याने काढून घेउन अविनाश वाघमारे यांची फसवणूक केली. अशा मजकुराच्या अविनाश वाघमारे यांनी दि. 17.10.2020 रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन भा.दं.सं. कलम- 419, 420 आणि माहिती तंत्रज्ञान कायदा कलम- 66 (सी), (डी) अन्वये येरमाळा येथे गुन्हा नोंदवला आहे.

जिल्हा पोलीस कार्यालयाच्या वतीने जिल्ह्यातील नागरिकांना सुचित करण्यात आले आहे. अशा प्रकारच्या कोणत्याही कॉल्सला प्रत्युत्तर देऊ नये व अशा फेक कॉल्स आल्यास जवळच्या पोलीस कार्यालयांमध्ये माहिती द्यावी , गुन्हा दाखल करावा असे आहवान पोलीस प्रशासनाने वेळोवेळी केले आहे

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा (0)
To Top