google.com, pub-1406548548385211, DIRECT, f08c47fec0942fa0 तुळजाभवानी देवीची नित्योपचार पूजा

तुळजाभवानी देवीची नित्योपचार पूजा

0
    तुळजाभवानी देवीची नित्योपचार पूजा

         उस्मानाबाद,दि.18: तुळजापूर येथे शारदीय नवरात्र महोत्सवात श्री तुळजाभवानी देवीची नित्योपचार पूजा करण्यात आली. शारदीय नवरात्राची आज दुसरी माळ. 
        तत्पूर्वी पहाटे 6 ते सकाळी 09 या वेळेत देवीची अभिषेक पूजा करण्यात आली. त्यानंतर आरती झाली. यापद्धतीने श्री तुळजाभवानी देवीजींचे दररोज विविध धार्मिक विधी विधीवत पार पाडले जातात.  
 श्री तुळजाभवानी देवीची विविध अलंकार पूजेस दि. 20 ऑक्टोबर पासून सुरुवात होत आहे. यात, दि.20 ऑक्टोबर रोजी रथ अलंकार महापूजा, दि. 21 ऑक्टोबर रोजी मुरली अलंकार महापूजा, दि.22 ऑक्टोबर रोजी शेषशाही अलंकार महापूजा, दि. 23 ऑक्टोबर रोजी भवानी तलवार अलंकार महापूजा आणि दि.24 ऑक्टोबर रोजी महिषासूर मर्दिनी अलंकार महापूजा होणार आहेत.
तत्पूर्वी, काल (शनिवार) रात्री 10 वाजता श्री देवीजींची छबिना मिरवणूक काढण्यात आली. 
***

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा (0)
To Top