राष्ट्रवादी सोडून गेलेल्या नेत्यांना राष्ट्रवादीत नो एन्ट्री - खासदार शरद पवार : खडसेंच्या पक्षप्रवेशावरच्या प्रश्नावर काय म्हणाले पहा
उस्मानाबाद :- राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद चंद्रजी पवार हे 18 व 19 ऑक्टोबर रोजी उस्मानाबाद जिल्ह्यात अतिवृष्टी झालेल्या तुळजापूर उमरगा लोहारा या ठिकाणी पाहणी करण्यासाठी आले होते यावेळी त्यांनी 19 ऑक्टोबर रोजी तुळजापूर येथे पत्रकार परिषद आयोजित केली होती . या पत्रकार परिषदेमध्ये पत्रकारांनी एकनाथ खडसे यांच्या राष्ट्रवादीत प्रवेश याबाबत विचारणा केली असता खा.शरद पवार यांनी खडसेंच्या पक्षप्रवेशावरच्या प्रश्नावर म्हणाले खडसे साहेब हे महाराष्ट्राचे विरोधी पक्षनेते होते,राज्याचे मंत्री होते,आणि एका पक्षाच्या उभारणीसाठी त्यांचे मोठे योगदान होते. त्यांचे कार्य दुर्लक्षित करण्यासारखे नव्हते मात्र काय निर्णय घ्यायचा ते त्यांनी ठरवावे असे प्रतिपादन राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा खा. शरद पवार यांनी तुळजापूर मध्ये आयोजित पत्रकार परिषदेत केले आहे.
आज असं दिसतंय की मागची वीस पंचवीस वर्षे जर बघितली तर विरोधकांच्या बाजूने सर्वात प्रभावी खडसे होते. त्यांनी दाखवलेलं कर्तृत्व त्यांनी केलेलं काम याची नोंद घेतली नाही असे त्यांना कदाचित वाटत नाही मला काही माहीत नाही मात्र तस वाटल्यानंतर माणूस कधितरी या विचारावरती येतो. असेही ते यावेळी म्हणाले, जिथे नोंद घेतली जात नाही तिथे राहावं का असा सवालही त्यांनी यावेळी केला. व यावेळी त्यांनी राष्ट्रवादीतून इतर पक्षात प्रवेश केलेल्या नेत्यांना मात्र पुन्हा राष्ट्रवादी प्रवेश मिळणार नाही ( राष्ट्रवादी सोडून गेलेल्या नेत्यांना राष्ट्रवादीत नो एन्ट्री ) असे स्पष्ट सांगितले आहे.
पहा पुर्ण पत्रकार परिषद 👇👇👇👇
व आज दिनांक 19 ऑक्टोबर चा परंडा पहाणी दौरा रद्द झाल्याची माहिती सोशल मीडियाच्या माध्यमातून त्यांनी दिली होती त्यामुळे ते साताऱ्याकडे रवाना झाले.