राज्यपालांनी पदावर आता राहायचे की नाही… : खा. शरद पवार
उस्मानाबाद / तुळजापूर – खासदार शरद पवार हे तुळजापूर येथे अतिवृष्टी झालेल्या पावसाची पाहणी करण्यासाठी 18 ऑक्टोबर रोजी आले होते . व पाहणी केल्यानंतर रात्री त्यांनी तेथील अधिकारी यांची बैठक घेतली आहे .व आज 19 सप्टेंबर रोजी सकाळी शरद पवार यांनी पत्रकार परिषद आयोजित केली होती.
मंदिरे उघडण्याच्या मागणीसाठी राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांनी मुखमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्र लिहिले होते. त्यातील भाषेवरून आणि उपस्थित केलेल्या सवालांवरून मोठे वादंग माजले आहे. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनीही राज्यपालांच्या भूमिकेबद्दल नाराजी व्यक्त केली आहे. या पार्श्वभूमीवर आत्मसन्मान असणारी व्यक्ती यानंतर त्या पदावर राहणार नाही, राष्ट्रवादी काँग्रेसचे पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी तुळजापूर येथे टोला राज्यपालांना लगावला आहे.
महाराष्ट्राच्या राज्यपालांनी मुख्यमंत्र्यांना पत्र लिहीताना काळजीपुर्वक शब्द निवडायला हवे होते, असे विधान अमित शहा यांनी नुकतेच केले आहे. यावर शरद पवार म्हणाले कि, गृहमंत्र्यांनी आता स्पष्ट नाराजी व्यक्त केली आहे. त्यामुळे आपल्याकडे एक म्हण आहे, शहाण्याला शब्दाचा मार, त्यामुळे ही म्हण इथे लागू होत आहे की नाही ते पाहावे लागेल. पण राज्यपाल हे शहाणे आहेत, त्यामुळे हा शब्द योग्य आहे की नाही, ते मला माहिती नाही, अशी टीका त्यांनी राज्यपालांवर केली आहे.
( नुकताच काही दिवसा अगोदर मंदिर उघडण्यासाठी मागणी करून भाजपाला राज्यातील जनतेच्या जीवाशी खेळायचं असे मत खा. संजय राऊत यांनी व्यक्त कले आहे. )
मी आजपर्यंत अनेक राज्यपाल पाहिले. सत्तेत असताना अनेक राज्यपालांशी संबंधही आला. पण, असे भाष्य करण्याचे धाडस कुणी केले नाही. राज्यपाल हे पद अत्यंत महत्त्वाचे आहे. त्यामुळे त्यांना या पदाची प्रतिष्ठा राखता आली पाहिजे. त्यांनी मुख्यमंत्रिपदाची ही प्रतिष्ठा राखायला हवी, राज्यपालपदावर आता त्यांना राहायचे की नाही, हा त्यांचा निर्णय आहे, असेही खा.शरद पवार यांनी तुळजापूर येथील पत्रकार परिषदेत म्हंटले आहे.
राष्ट्रवादी सोडून गेलेल्या नेत्यांना राष्ट्रवादीत नो एन्ट्री - खासदार शरद पवार : खडसेंच्या पक्षप्रवेशावरच्या प्रश्नावर काय म्हणाले पहा
उस्मानाबाद :- राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद चंद्रजी पवार हे 18 व 19 ऑक्टोबर रोजी उस्मानाबाद जिल्ह्यात अतिवृष्टी झालेल्या तुळजापूर उमरगा लोहारा या ठिकाणी पाहणी करण्यासाठी आले होते यावेळी त्यांनी 19 ऑक्टोबर रोजी तुळजापूर येथे पत्रकार परिषद आयोजित केली होती . या पत्रकार परिषदेमध्ये पत्रकारांनी एकनाथ खडसे यांच्या राष्ट्रवादीत प्रवेश याबाबत विचारणा केली असता खा.शरद पवार यांनी खडसेंच्या पक्षप्रवेशावरच्या प्रश्नावर म्हणाले खडसे साहेब हे महाराष्ट्राचे विरोधी पक्षनेते होते,राज्याचे मंत्री होते,आणि एका पक्षाच्या उभारणीसाठी त्यांचे मोठे योगदान होते. त्यांचे कार्य दुर्लक्षित करण्यासारखे नव्हते मात्र काय निर्णय घ्यायचा ते त्यांनी ठरवावे असे प्रतिपादन राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा खा. शरद पवार यांनी तुळजापूर मध्ये आयोजित पत्रकार परिषदेत केले आहे.
आज असं दिसतंय की मागची वीस पंचवीस वर्षे जर बघितली तर विरोधकांच्या बाजूने सर्वात प्रभावी खडसे होते. त्यांनी दाखवलेलं कर्तृत्व त्यांनी केलेलं काम याची नोंद घेतली नाही असे त्यांना कदाचित वाटत नाही मला काही माहीत नाही मात्र तस वाटल्यानंतर माणूस कधितरी या विचारावरती येतो. असेही ते यावेळी म्हणाले, जिथे नोंद घेतली जात नाही तिथे राहावं का असा सवालही त्यांनी यावेळी केला. व यावेळी त्यांनी राष्ट्रवादीतून इतर पक्षात प्रवेश केलेल्या नेत्यांना मात्र पुन्हा राष्ट्रवादी प्रवेश मिळणार नाही ( राष्ट्रवादी सोडून गेलेल्या नेत्यांना राष्ट्रवादीत नो एन्ट्री ) असे स्पष्ट सांगितले आहे.
व आज दिनांक 19 ऑक्टोबर चा परंडा पहाणी दौरा रद्द झाल्याची माहिती सोशल मीडियाच्या माध्यमातून त्यांनी दिली होती त्यामुळे ते साताऱ्याकडे रवाना झाले.