google.com, pub-1406548548385211, DIRECT, f08c47fec0942fa0 उस्मानाबाद जिल्ह्यात 2 ठिकाणी चोरी : गुन्हे दाखल

उस्मानाबाद जिल्ह्यात 2 ठिकाणी चोरी : गुन्हे दाखल

0


उस्मानाबाद जिल्ह्यात 2 ठिकाणी चोरी : गुन्हे दाखल 

पोलीस ठाणे, वाशी: सोलापूर- औरंगाबाद बस क्र. एम.एच. 20 बीसी 4059 ही दि. 22.11.2020 रोजी 08.30 वा. सु. सरमकुंडी फाटा येथे नाश्त्यासाठी थांबली असता सर्व प्रवासी बसमधुन उतरले होते. यावेळी बसमध्ये कोणीही नसल्याचा फायदा घेउन अज्ञात चोरट्याने प्रवासी- मेघा प्रमोद व्याहाळकर, रा. पुष्पनगरी, औरंगाबाद यांच्या पिशवीतील 70 ग्रॅम सोन्याचे दागिने चोरुन नेले. अशा मजकुराच्या मेघा व्याहाळकर यांनी दिलेल्या प्रथम खबरेवरुन भा.दं.सं. कलम- 379 अन्वये गुन्हा नोंदवला आहे.

पोलीस ठाणे, परंडा: अतुल शिवसिंह ठाकुर, रा. राजापुर गल्ली, परंडा हे दि. 22.11.2020 रोजी 20.39 वा. सु. शिवाजी चौक, परंडा येथील आपले किराणा दुकान उघडे ठेउन लघुशंकेसाठी रस्त्यापलीकडे गेले होते. तेथून परतल्यावर दुकानाच्या गल्ल्यातील 4,300 ₹ रोख रक्कम चोरीस गेल्याचे त्यांच्या निदर्शनास आले. अशा मजकुराच्या अतुल ठाकुर यांनी आज दि. 23.11.2020 रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन भा.दं.सं. कलम- 379 अन्वये गुन्हा नोंदवला आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा (0)
To Top