उस्मानाबाद जिल्ह्यात जुगार विरोधी मोहिमेदरम्यान तीन छापे : गुन्हे दाखल

0



जुगार विरोधी कारवाई.

पोलीस ठाणे, कळंब: जुगार विरोधी मोहिमेदरम्यान कळंब पो.ठा. हद्दीत काल दि. 23.11.2020 रोजी तीन छापे टाकण्यात आले.

पहिल्या घटनेत परिविक्षाधीन सहायक पोलीस अधीक्षक श्री ऋषीकेश रावळे यांच्यासह पथकाने 14.52 वा. सु. शिवाजी चौक कळंब येथील पाखरे फुटवेअर या दुकानात छापा मारला. यावेळी 1)गणपत भोसले 2)रमेश मगर 3)बाळासाहेब जाधव 4)गणेश इंगळे 5)भालचंद्र मुंडे 6)नानासाहेब बोराडे 7)माणिक गाडे 8)बजरंग साळुंके 9)लक्ष्मण ढगे 10)बाळासाहेब गाढे 11)नसीबखॉ पठाण, सर्व रा. कळंब हे कल्याण मटका जुगार खेळत असतांना जुगार साहित्यासह 7 भ्रमणध्वनी व 60,270 ₹ रोख रक्कम बाळगले असलेले आढळले.

दुसऱ्या घटनेत कळंब पो.ठा. च्या पथकाने होळकर चौक येथील पत्रा शेडमध्ये 16.15 वा. सु. छापा मारला यावेळी 1)शफीक बागवान 2)गोरकनाथ थोरात, दोघे रा. कळंब हे कल्याण मटका जुगार खेळत असतांना जुगाराचे साहित्य व 1,900 ₹ रोख रक्कम  बाळगले असलेले तर तिसऱ्या घटनेत कळंब येथील तांदुळवाडी रस्त्यालगत 21.30 वा. सु. एका झाडाखाली छापा मारला यावेळी 1)अमोल राउत 2)अनिकेत दावारे 3)सोनाजी निंगोळे 4)हर्षद पवार 5)अशोक कांबळे 6)कृष्णा शिरपुरकर 7)सुमित कांबळे 8)सागर राउत, सर्व रा. कळंब हे सुरट नावाचा जुगार खेळत असतांना जुगार साहित्य व 5,510 ₹ रोख रक्कम बाळगले असलेले पथकास आढळले.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा (0)
To Top