उस्मानाबाद जिल्ह्यात 3 ठिकाणी चोरी गुन्हे दाखल
उस्मानाबाद ,पोलीस ठाणे, ढोकी: अंकुश शिवाजी काटे, रा. सौंदण, ता. कळंब यांच्या सौंदण शिवारातील शेतातील पत्रा शेडचे कुलूप अज्ञात चोरट्याने दि. 23.11.2020 रोजी रात्री 01.00 वा. सु. तोडून शेडमधील दोन शेळ्या व एक बोकड चोरुन नेले आहे. अशा मजकुराच्या अंकुश काटे यांनी काल दि. 23.11.2020 रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन भा.दं.सं. कलम- 461, 380 अन्वये गुन्हा नोंदवला आहे.
उस्मानाबाद ,पोलीस ठाणे, वाशी: शिवाजी चिंतामण घोळवे, रा. वाशी यांनी आपली हिरो एचएफ डीलक्स मो.सा. क्र. एम.एच. 25 एजी 8244 ही दि. 22.11.2020 रोजी 14.00 वा. सु. आठवडा बाजार, वाशी येथे लावून बाजारात गेले हाते. परत आल्यावर 15.00 वा. सु. त्यांना ती मोटारसायकल लावल्या जगी आढळली नसलयाने ती अज्ञात चोरट्याने चोरुन नेली आहे. अशा मजकुराच्या शिवाजी घोळवे यांनी काल दि. 23.11.2020 रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन भा.दं.सं. कलम- 379 अन्वये गुन्हा नोंदवला आहे.
उस्मानाबाद , पोलीस ठाणे, कळंब: दयावान घोळवे, रा. सोनारवाडी, ता. वाशी यांनी त्यांची हिरो होन्डा स्प्लेंडर एम.एच. 25 एबी 5148 ही बाजार मैदान, कळंब येथे दि. 23.11.2020 रोजी सकाळी 08.00 वा. सु. लावली होती. ती त्या ठिकाणी 08.30 वा. न आढळल्याने ती अज्ञात चोरट्याने चोरुन नेली आहे. अशा मजकुराच्या दयावान घोळवे यांनी आज दि 24.11.2020 रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन भा.दं.सं. कलम- 379 अन्वये गुन्हा नोंदवला आहे.
पोलीस ठाणे, भुम: रंजीत चोरमले, रा. झेंडेवाडी, ता. भुम यांच्या राहत्या घराच्या दरवाजातून दि. 23.11.2020 रोजी पहाटेच्या सुमारास अज्ञात चोरट्याने प्रवेश करुन घरातील धान्य कोठीत ठेवलेले 27 ग्रॅम सोन्याचे दागिने चोरुन नेले. अशा मजकुराच्या रंजीत चोरमले यांनी आज दि. 24.11.2020 रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन भा.दं.सं. कलम- 457, 380 अन्वये गुन्हा नोंदवला आहे.