उस्मानाबाद जिल्ह्यात 3 ठिकाणी अपघात : गुन्हे दाखल
उस्मानाबाद , पोलीस ठाणे, वाशी: काकासाहेब जयवंत गरड, वय 37 वर्षे, रा. चिंचपूर (खु.), ता. परंडा व भानुदास देवीदास टाले, वय 38 वर्षे, रा. सोमठाण, जि. अकोला हे दोघे दि. 20.11.2020 रोजी 07.30 वा. सु. पारगाव शिवारातील राष्ट्रीय महामार्ग क्र. 52 च्या पुलावरुन मो.सा. क्र. एम.एच. 25 झेड 6761 ने प्रवास करत होते. यावेळी मारुती सेलेरिओ कार क्र. एम.एच. 14 जेए 1816 च्या अज्ञात चालकाने कार निष्काळजीपणे चालवून काकासाहेब गरड चालवत असलेल्या नमूद मो.सा. ला पाठीमागून धडक दिली. या अपघातात काकासाहेब यांसह पाठीमागे बसलेले भानुदास टाले हे गंभीर जखमी होउन मयत झाले. अशा मजकुराच्या अजीत भागवत गरड, रा. चिंचपुर (खु) यांनी काल दि. 23.11.2020 रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन भा.दं.सं. कलम- 279, 304 (अ) आणि मो.वा.का. कलम- 184 अन्वये गुन्हा नोंदवला आहे.
उस्मानाबाद , पोलीस ठाणे, परंडा: सुवर्णा सोमनाथ चव्हाण, वय 44 वर्षे, रा. जवळा (नि.), ता. परंडा व मुलगा- आकाश हे दोघे दि. 10.11.2020 रोजी 09.30 वा. सु. गोलेगाव फाटा, ता. भुम येथील रस्त्याच्या कडेला बसची वाट पहात थांबले होते. यावेळी मो.सा. क्र. एम.एच. 25 एआर 2901 च्या अज्ञात चालकाने मो.सा. निष्काळजीपणे, भरधाव वेगात चालवून सुवर्णा चव्हाण यांना समोरुन धडक दिली. या अपघातात सुवर्णा चव्हाण यांच्या डोक्यास गंभीर मार लागल्याने उपचारादरम्यान मयत झाल्या. अपघातानंतर नमूद मो.सा. चा अज्ञात चालक घटनास्थळावरुन मो.सा.सह पसार झाला. अशा मजकुराच्या आकाश चव्हाण यांनी काल दि. 23.11.2020 रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन भा.दं.सं. कलम- 279, 304 (अ) आणि मो.वा.का. कलम- 184, 134 (अ) (ब) अन्वये गुन्हा नोंदवला आहे.
उस्मानाबाद , पोलीस ठाणे, तामलवाडी: सांगवी शिवारातील जम्मु- पंजाब ढाब्यासमोरील राष्ट्रीय महामार्ग क्र. 52 वर दि. 22.11.2020 रोजी सकाळी 06.30 वा. सु. सोलापूर- तुळजापूर जाणाऱ्या इरटीगा कार क्र. एम.एच. 04 जेके 2690 ला अज्ञात ट्रक चालकाने धडक दिली. या अपघातात कारमधील ललीता आल्ले वय 55 वर्षे, रा. भिवंडी या गंभीर जखमी होउन मयत झाल्या. तर कारमधील अन्य तीघेजण जखमी झाले. अशा मजकुराच्या इरटीगा कार चालक- गणेश गंजम, रा. भिवंडी यांनी आज दि. 24.11.2020 रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन भा.दं.सं. कलम- 279, 337, 338, 304 (अ) आणि मो.वा.का. कलम- 134 (अ) (ब), 184 अन्वये गुन्हा नोंदवला आहे.