उस्मानाबाद शिवसेनेच्या उप-शहर प्रमुख चा भाजपमध्ये प्रवेश , Osmanabad Shiv Sena Deputy City Chief joins BJP

0


उस्मानाबाद शिवसेनेच्या उप-शहर प्रमुख चा भाजपमध्ये प्रवेश 

उस्मानाबाद शहरातील शिवसेनेचे धडाडीचे कार्यकर्ते तथा उप-शहर प्रमुख श्री.विनोद निंबाळकर आणि मित्र परिवार तसेच श्री.सुरज शेरकर व त्यांचे सहकारी यांनी भारतीय जनता पक्षामध्ये जाहीर प्रवेश केला आहे . प्रतिष्ठान भवन, उस्मानाबाद येथे आमदार राणा जगजितंसिंह पाटील यांच्या प्रमुख उपस्थित भाजप मध्ये प्रवेश केला आहे 
या वेळी आमदार राणा जगजितंसिंह पाटील यांनी
भाजपात स्वागत करून सर्वांचे अभिनंदन केले व  पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या आहेत.

यावेळी भारतीय जनता पक्षाचे उस्मानाबाद जिल्हाध्यक्ष श्री.नितीन काळे, जिल्हा सरचिटणीस श्री.प्रदीप शिंदे, युवा मोर्चा जिल्हाध्यक्ष श्री.राजसिंहा राजेनिंबाळकर, शहराध्यक्ष श्री.राहुल काकडे, श्री.प्रवीण पाठक आदी पदाधिकारी उपस्थित होते.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा (0)
To Top