उस्मानाबाद जिल्ह्यात 3 ठिकाणी अपघात गुन्हे दाखल
1, उस्मानाबाद जिल्ह्यातील पोलीस ठाणे, लोहारा हद्दीत ग्राम- नागुर, ता. लोहारा येथील सुरेंद्र पाटील यांच्या शेतात मजुर- रमेश नामदेव गवळी, वय 55 वर्ष हा दि. 16/12/2020 रोजी 15.00 वाजता उसाचे वाढे गोळा करत होता. यावेळी चालक- सुरेश शिंदे, रा. तुळजापुर याने उस कापणी हार्वेस्टर ट्रॅक्टर क्र. एम. एच. 09 यु. 553 हा निष्काळजीपणे व खात्री न करता मागे घेतल्याने हार्वेस्टरचे चाक मजुर- लक्ष्मण गवळी यांच्या अंगावरुन गेल्याने त्यांचा म`त्यु झाला. अशा मजकुराच्या लक्ष्मण गवळी यांनी दिलेल्या प्रथम खबरे वरुन दि. 18.12.2020 रोजी भा.दं.सं. कलम- 279, 304 (अ) अन्वये गुन्हा नोंदवला आहे.
2 ,उस्मानाबाद जिल्ह्यातील पोलीस ठाणे आनंदनगर हद्दीत अज्ञात चालकाने नोंदणी क्रमांकाची पाटी नसलेला ट्रॅक्टर-ट्रेलर दि. 17/12/2020 रोजी 19.00 वाजता उस्मानाबाद-सांजा रस्त्यावर निष्काळजीपणे व चुकीच्या दिशेने चालवुन समोरुन येणा-या मोटार सायकल क्र. एम. एच. 25 एएन 1120 ला धडक दिली. या अपघातात मोटार सायकलवरील खंडु जकाते, वय 55 वर्ष रा. सांजा यांसह त्यांच्या 03 वर्षीय पुतणीचा म`त्यु झाला. अशा मजकुराच्या प्रविण लक्ष्मण जकाते यांनी दिलेल्या प्रथम खबरे वरुन दि. 18.12.2020 रोजी भा.दं.सं. कलम- 279, 304 (अ) अन्वये गुन्हा नोंदवला आहे.
3 ,उस्मानाबाद जिल्ह्यात पोलीस ठाणे, ढोकी हद्दीत अज्ञात चालकाने दि. 17/12/2020 रोजी 20.30 वाजता बाबा पेट्रोलियम विक्री केंद्रा समोर कार निष्काळजीपणे चालवुन रस्त्याच्या बाजुस लघवी करण्यास थांबलेल्या नितीन अंगरखे यांना धडक दिल्याने ते गंभीर जखमी झाले. अपघातानंतर अज्ञात चालक जखमीस वैद~यकीय उपचाराची तजविज न करता व अपघाताची खबर नजीकच्या पोलीस ठाण्यास न देता घटनास्थळावरुन वाहनासह पसार झाला. अशा मजकुराच्या नितीन अंगरखे यांनी वैद~यकीय उपचारादरम्यान दिलेल्या निवेदना वरुन दि. 18.12.2020 रोजी भा.दं.सं. कलम- 279, 304 (अ) अन्वये गुन्हा नोंदवला आहे.