उस्मानाबाद जिल्ह्यातील 428 ग्रामपंचायत निवडणूक 1377 प्रभाग तर 3662 सदस्यांची निवड होणार !
उस्मानाबाद जिल्ह्यात 428 ग्रामपंचायतीच्या निवडणूक होणार असून यात 1377 प्रभागातून 3652 ग्रामपंचायत सदस्यांची निवड होणार आहे . जिल्ह्यातील 428 ग्रामपंचायत निवडणुकीसाठी १ हजार 462 मतदान केंद्राचा आराखडा प्रशासनाने तयार केला आहे . गावपातळीवरील सत्तेसाठी महत्वाच्या असलेल्या या निवडणुकीत सर्वच राजकीय पक्ष तयारीला लागले आहेत .
त्याच बरोबर जिल्हा प्रशासनाला covid-19 प्रादुर्भाव रोखण्यासाठी मोठे प्रयत्न करावे लागणार आहे.
उस्मानाबाद जिल्हाधिकारी कौस्तुभ दिवेगावकर यांच्या मार्गदर्शनाखाली 05 -औरंगाबाद पदवीधर मतदान 2020 निवडणूक नुकतीच पार पडली आहे यामध्ये जिल्हा प्रशासनाने covid-19 प्रादुर्भाव होऊ नये यासाठी विविध उपाययोजना केल्या होत्या. व यशस्वीरित्या
ग्रामपंचायत निवडणुकीमध्ये मात्र प्रशासनाला त्यापेक्षा अधिक परिश्रम घ्यावे लागणार आहे. रोजगारासाठी मोठमोठ्या शहरांमध्ये गेलेल्या नागरिक ग्रामपंचायत मतदानासाठी गावांमध्ये परत येताना त्यांच्या प्राथमिक
तपासण्या करणे व covid-19 प्रादुर्भाव होऊ नये यासाठी उपाययोजना करणे हे जिल्हा प्रशासनासमोर मोठे आव्हान ठरणार आहे.
उस्मानाबाद जिल्ह्यात 428 ग्रामपंचायती निवडणूक होणार असून 1 हजार 377 प्रभाग आहेत. 11 सदस्य असलेल्या ग्रामपंचायती 34 तर 13 सदस्य असलेल्या ग्रामपंचायती 14 व 15 सदस्य असलेल्या ग्रामपंचायती 7 असून 17 सदस्य असलेल्या 6 ग्रामपंचायती आहेत .
7 सदस्य असलेल्या 207 ग्रामपंचायती असून 9 सदस्य असलेल्या 160 ग्रामपंचायती आहेत .
उस्मानाबाद तालुक्यात 66 ग्रामपंचायतीच्या निवडणूक होणार असून 216 प्रभागात 602 जागा आहेत तर तुळजापूर तालुक्यात 53 ग्रामपंचायतीत 172 प्रभागात 461 जागा आहेत . कळंब 59 ग्रामपंचायत 188 प्रभागात 495 सदस्य ,
उमरगा 4 ग्रामपंचायतमध्ये 171 प्रभागात 453 सदस्य , लोहारा 26 ग्रामपंचायत 84 प्रभागात 222 सदस्य आहेत.
भूम 71 ग्रामपंचायत 220 प्रभागात 565 सदस्य , परंडा 70 ग्रामपंचायत 217 प्रभागात 566 सदस्य तर वाशी 34 ग्रामपंचायत 109 प्रभागात 288 जागा आहेत.