उस्मानाबाद जिल्ह्यात 5 ठिकाणी अपघात : 5 जणांचा मृत्यू , 2 गभीर जखमी !
उस्मानाबाद, पोलीस ठाणे, उमरगा: चालक- राजेंद्र सुभाष लिंबाळे, रा. एकुरगा, ता. उमरगा यांनी दि. 07.12.2020 रोजी 07.30 वा. सु. जेकेकुर येथील पुलावरील रस्त्यावर मो.सा. क्र. एम.एच. 25 एआर 4965 ही निष्काळजीपणे चालवून 1 ईस्म हे चालवत असलेल्या मोटारसायकलला पाठीगुन धडक दिली. या अपघातात 1 ईस््म् यांची मो.सा. पुलाचा कठड्यास धडकुन 1 ईस्म हे गंभीर जखमी होउन पुलाखालील पाण्यात पडून मयत झाले. अपघातानंतर नमूद चालक मो.सा. सह घटनास्थळावरुन पसार झाला. अशा मजकुराच्या महंमद बाबु शेख, रा. दाळींब, ता. उमरगा यांनी दिलेल्या प्रथम खबरेवरुन भा.दं.सं. कलम- 279, 304 (अ) आणि मो.वा.का. कलम- 184, 134 (अ) (ब) अन्वये गुन्हा नोंदवला आहे.
उस्मानाबाद, पोलीस ठाणे, उस्मानाबाद (ग्रा.): अरुण आप्पासाहेब वीर, वय 42 वर्षे, रा. आळणी, ता. उस्मानाबाद हे दि. 06.12.2020 रोजी 18.30 वा. सु. उस्मानाबाद- आळणी मो.सा. क्र. एम.एच. 25 एपी 1844 चालवत जात होते. यावेळी अज्ञात वाहन चालकाने निष्काळजीपणे वाहन चालवून अरुण वीर यांच्या मो.सा. ला धडक दिल्याने ते गंभीर जखमी होउन मयत झाले. अपघातानंतर संबंधीत वाहन चालक वाहनासह घटनास्थळावरुन पसार झाला. अशा मजकुराच्या इंद्रजीत रमाकांत वीर, रा. आळणी यांनी काल दि. 09.12.2020 रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन भा.दं.सं. कलम- 279, 304 (अ) आणि मो.वा.का. कलम- 184 अन्वये गुन्हा नोंदवला आहे.
उस्मानाबाद, पोलीस ठाणे, कळंब: अनंत पालकर, रा. सोंदना, ता.कळंब यांनी दि. 09.12.2020 रोजी सायंकाळी 06.45 वा. सु. येरमाळा येथे बजाज डिस्कव्हर मोटारसायकल निष्काळजीपणे चालवून समोरील बाजूने येणाऱ्या मोटारसायकलला धडक दिली. या अपघातात अनंत पालकर हे गंभीर जखमी होउन मयत झाले. तर समोरील मो.सा. वरील किरण सुतार व भाग्यवंत क्षिरसागर, दोघे रा. ईटकुर, ता. कळंब हे गंभीर जखमी झाले. अशा मजकुराच्या किरण सुतार यांनी दिलेल्या प्रथम खबरेवरुन मयत मा.सा. चालकावर भा.दं.सं. कलम- 279, 304 (अ), 337, 338 आणि मो.वा.का. कलम- 184 अन्वये दि. 10.12.2020 रोजी गुन्हा नोंदवला आहे.
उस्मानाबाद, पोलीस ठाणे, ढोकी: दिवाकर बलभीम इंगळे, वय 36 वर्षे, रा. समतानगर, उस्मानाबाद हे दि. 05.12.2020 रोजी खेड, ता. कळंब शिवारातील रस्त्याने मो.सा. ने जात असतांना अज्ञात चालकाने इंडिका कार क्र. एम.एच. 44 जे 1391 ही निष्काळजीपणे चालवून दिवाकर इंगळे यांच्या मो.सा. ला धडक दिली. या अपघातात इंगळे यांचा मृत्यु झाला. अशा मजकुराच्या मयताची पत्नी राणी इंगळे यांनी दिलेल्या लेखी निवेदनावरुन भा.दं.सं. कलम- 279, 304 (अ) आणि मो.वा.का. कलम- 184, 134 (अ) (ब) अन्वये गुन्हा नोंदवला आहे.
उस्मानाबाद, पोलीस ठाणे, वाशी: विठ्ठल सिताराम गावडे, पखरुड, ता. भुम हे दि. 09.12.2020 रोजी 18.45 वा. सु. पखरुड- देवाची वाडी रस्त्यावरुन मटकरमळा येथे पायी जात होते. यावेळी अज्ञात चालकाने दोन ट्रेलर जोडलेला ट्रॅक्टर क्र. एम.एच. 25 जी 2672 हा निष्काळजीपणे चालवून विठ्ठल गावडे यांना पाठीमागून जोराची धडक दिल्याने ते मयत झाले. अशा मजकुराच्या विठ्ठल गावडे यांचा मुलगा- महादेव यांनी दिलेल्या प्रथम खबरेवरुन भा.दं.सं. कलम- 279, 304 (अ) अन्वये दि. 10.12.2020 रोजी गुन्हा नोंदवला आहे.