लातूरचे जिल्हाधिकारी म्हणून बी.पी. पृथ्वीराजयांनी पदभार स्वीकारला

0
लातूरचे जिल्हाधिकारी म्हणून बी.पी. पृथ्वीराज
यांनी पदभार स्वीकारला

लातूर, दि.10 (प्रतिनिधी ):- राज्याच्या सामान्य प्रशासन विभागाकडून 8 डिसेंबर 2020 रोजी लातूरचे जिल्हाधिकारी म्हणून परभणी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी बी.पी. पृथ्वीराज यांची नियुक्ती केलेली होती. त्या अनुषंगाने जिल्हाधिकारी जी. श्रीकांत यांच्याकडून बी. पी. पृथ्वीराज यांनी लातूरच्या जिल्हाधिकारी पदाचा पदभार आज स्वीकारला.

यावेळी जिल्हा परिषदेचे प्रभारी मुख्य कार्यकारी अधिकारी संतोष जोशी, महापालिकेचे आयुक्त देविदास टेकाळे, अप्पर जिल्हाधिकारी अरविंद लोखंडे, निवासी उपजिल्हाधिकारी विजयकुमार ढगे, उपजिल्हाधिकारी जीवन देसाई, गणेश महाडिक, शोभा जाधव, उपजिल्हा निवडणूक अधिकारी सुचिता शिंदे, उप विभागीय  अधिकारी सुनील यादव, अविनाश कांबळे जिल्हा अध्यक्ष कृषी अधिकारी दत्तात्रेय दुसाने यांच्यासह जिल्हा अधिकारी कार्यालयातील विविध विभागांचे विभाग प्रमुख तसेच प्रशासनातील इतर अधिकारी उपस्थित होते.

यावेळी लातूरचे जिल्हाधिकारी जी. श्रीकांत यांनी नवनियुक्त जिल्हाधिकारी बी.पी. पृथ्वीराज यांना पदभार दिला व त्यांचा पुष्पगुच्छ देऊन सत्कार केला.
यावेळी नवनियुक्त जिल्हाधिकारी पृथ्वीराज यांनी उपस्थित सर्व अधिकाऱ्यांना लातूर जिल्हा मराठवाड्यातील महत्त्वाचा जिल्हा असून या जिल्ह्याचे विभागातील कामकाज अत्यंत चांगले असून यापुढील काळातही सर्व शासकीय यंत्रणेने सहकार्य करावे अशी अपेक्षा व्यक्त केली. तसेच यावेळी त्यांनी उपस्थित विभाग प्रमुखाकडून संक्षिप्तपणे त्यांच्या कामाचा आढावा घेतला व पुढील दोन दिवसात जिल्ह्यातील सर्व विभागप्रमुख यांनी त्यांच्या विभागाची सविस्तर माहिती सादर करावी असे त्यांनी सूचित केले. यावेळी उपस्थित सर्व विभाग प्रमुख यांनी नवनियुक्त जिल्हाधिकारी बी.पी. पृथ्वीराज यांचा पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा (0)
To Top