उस्मानाबाद शहरातील नवीन हायवे क्र. 52 च्या सर्विस रोडचे काम सुरू करण्यासाठी नगराध्यक्ष मकरंद राजेनिंबाळकर यांचे जिल्हाधिकार्यांना निवेदन
उस्मानाबाद :- उस्मानाबाद शहर हद्दीतुन जाणा - या नॅशनल हायवे जुना क्र .211 नवीन क्र . 52 लगत सर्विस रोड करून देणे बाबत पत्र क्र .1 . जा.क्र .390 / 18 दिनांक 29.01.2018 2. जा.क्र . 894/18 दिनांक 06.03.2018 या संदर्भीय पत्रांद्वारे विनंती केली होती . परंतु अद्याप त्याबाबत काहीच कार्यवाही झालेली नाही . सदर ठिकाणी सर्विस रोड नसल्यामुळे तेथील नागरीक मोठया प्रमाणात त्रस्त झाले असून त्यांना रोज गैरसोई ला तोंड दयावे लागत आहे . व ब-याच नागरिकांनी तेथे आपला जिव गमवला आहे . तरी देखील तेथे सर्विस रोड चे काम हाती घेण्यात आलेले नाही . वास्तविक पाहता रस्त्या लगत असणा - या नागरिकांनी एन.ए. लेआऊट करत असताना सर्विस रोड सोडला होता .ती सर्विस रोड साठी सोडलेली जागा.सदर जागा मालकांनी नगर परिषदेला नाम मात्र किमतीत मालकी हक्काने लिहून दिलेली होती . सदर जागा नगर परिषदेच्या मालकीची होती . ती नॅशनल हायवे अॅथोरटीला विना मोबदला मिळालेली आहे . तरी देखील नॅशनल हायवे ॲथोरटी व आय . आर . बी . सदर रस्त्या लगत सर्विस रोड ची सेवा देण्यास तयार नाही . खर मंजे सदर गंभीर प्रकरणामध्ये आय . आर.बी. यांचे विरूद्ध गुन्हा दाखल करणे अपेक्षित होतं स्नेह विकास सोसायटी परंतू दुर्दैवाने तसे झाले नाही . ज्या कामासाठी नगर परिषदेने जमीन घेतली त्या कामाचा उद्देश साध्य न करता इतर प्रयोजनासाठी जमीन वापरणे . एक गुन्हा व सदर गैरसोई मुळे नागरिकांचा जिव गेला त्या बाबत 302 चा गुन्हा दाखल होणे अपेक्षित आहे . सदर विषया संबंधी आम्ही खासदार श्री . ओमप्रकाश राजेनिंबाळकर साहेब व आय.आर.बी व नॅशनल हायवे अॅथोरटी अधिका -यां समवेत तीन वेळेस बैठक घेऊन सदर विषय मार्गी लावण्यास विनंती केली . प्रत्येक बैठकी वेळी पुढच्या महीन्यात काम सुरू करू असे आश्वासन देण्यात आले परंतु अद्याप पर्यंत काम सुरू झाले नाही . सदर रस्त्या वरती आय.आर.बी. मार्फत टोल वसुली देखील सुरू आहे . परंतू नागरीकांची सोय मात्र केली गेली नाही . त्यामुळे शहर वासीयांच्या वतीने येत्या 15 दिवसात सदर महामार्गावर सर्विस रोडचे काम सुरू होत नाही . तो पर्यंत सदर रस्ता कायम बंद ठेवण्याचे आंदोलन करण्यात येणार आहे . सदर आंदोलना मुळे होण्या -या नुकसानीस आय.आर.बी. व नॅशनल हायवे अॅथोरटी जबाबदार असतील . तरी विनंती की , वरील बाबींचा विचार करून आपल्या स्थरावर योग्य ते आदेश देऊन नागरीकांची गैरसोय टाळावी अशी निवेदनाद्वारे मागणी उस्मानाबाद नगरपरिषद नगराध्यक्ष मकरंद राजेनिंबाळकर यांनी जिल्हाधिकारी कौस्तुभ दिवेगावकर यांना निवेदन देत केली आहे