छत्रपती शिवाजी महाराज यांच्या तुळजापूर येथील तुळजापूर सोलापूर रोडवरील आश्वारूढ पुतळा दुरूस्ती करून बसवण्याची जिल्हाधिकारी यांच्याकडे मागणी

0

छत्रपती शिवाजी महाराज यांच्या तुळजापूर येथील तुळजापूर सोलापूर रोडवरील आश्वारूढ पुतळा दुरूस्ती करून बसवण्याची जिल्हाधिकारी यांच्याकडे मागणी

उस्मानाबाद :- जिल्ह्यातील तुळजापूर शहरातील
रयतेचे राजे श्री छत्रपती शिवाजी महाराज यांच्या तुळजापूर सोलापूर रोडवरील आश्वारूढ पुतळा दुरूस्ती करून बसविणेबाबत मराठा ठोक क्रांती मोर्चा समन्वय समिती तुळजापूर यांच्या वतीने जिल्हाधिकारी यांच्याकडे निवेदनाद्वारे ही मागणी करण्यात आली आहे.

  श्री छत्रपती शिवाजी महाराज यांच्या आश्वारूढ पुतळयाच्या दुरूस्तीचा व सुशोभीकरण करण्याचा ठराव नगरपालिकेने २००५ साली घेण्यात आला आणि तब्बल १३ वर्षानंतर काम सुरू झाले . ते ही चूकीच्या पध्दतीने चालू आहे . दुरूस्तीसाठी पुतळा काढण्यात आला मात्र पुतळा बसविण्याची तारीख दिली नाही . शिवराय मूर्ती सुशोभीकरण बैठकीत पुतळा पहिल्या मूळ जागी बसवावा यावर सर्वांचे एकमत झाले . त्यावेळी तैलचित्राचे उद्घाटन ही झाले . तरीही गेल्या २ वर्षापासून काम चालू झाले नाही . तसेच पुतळा बसविणेबाबत नगर परिषद तुळजापूर यांना या अगोदर वारंवार अर्ज देवून त्याकडे जाणुनबुजून दुर्लक्ष केलेले आहे . तरी मा.साहेबांनी शिवप्रेमीची नाराजी लक्षात घेऊन शिवराय मूर्ती सुशोभीकरण समिती व नगरपालिका यांची तातडीची बैठक घेऊन ऐतिहासिक छत्रपती शिवराय पुतळा लवकरात लवकर बसवावा अशी मागणी उस्मानाबाद जिल्हाधिकारी कौस्तुभ दिवेगावकर यांना निवेदन देऊन मराठा ठोक क्रांती मोर्चा समन्वय समिती तुळजापूर यांच्यावतीने
 करण्यात आली आहे .

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा (0)
To Top