उस्मानाबाद जिल्ह्यात अवैध मद्य विरोधातील विशेष मोहिमे दरम्यान 39 छापे

0


उस्मानाबाद जिल्ह्यात अवैध मद्य विरोधातील विशेष मोहिमे दरम्यान 39 छापे 

उस्मानाबाद जिल्हा: काल बुधवार दि. 06.01.2021 रोजी मा. पोलीस अधीक्षक श्री. राज तिलक रौशन यांच्या आदेशावरुन अवैध मद्य विरोधी विशेष मोहिम करण्यात आली. या मोहिमेदरम्यान 39 कारवाया करण्यात आल्या. या छाप्यात आढळलेला गावठी दारु निर्मीतीचा 1,600 लि. द्रवपदार्थ जागीच ओतून नष्ट करण्यात आला तर 356 लि. गावठी दारु, देशी- विदेशी दारुच्या 377 बाटल्या जप्त करण्यात आल्या. ओतून दिलेला मद्यार्क निर्मीतीचा द्रवपदार्थ व जप्त दारु यांची एकत्रीत किंमत 98,616 ₹ आहे. यावरुन 39 व्यक्तींविरुध्द म.दा.का. अंतर्गत संबंधीत पोलीस ठाण्यात 39 गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.

* पो.ठा. उस्मानाबाद (ग्रा.): सुरेश गंगावणे, रा. वरुडा, ता. उस्मानाबाद हे आपल्या राहत्या घराजवळ 24 लि. अवैध गावठी दारु (किं.अं. 1,920 ₹) बाळगले असतांना आढळले.

* पो.ठा. तुळजापूर: सुधाकर शिवाजी शिंदे, रा. कुंभारी, ता. तुळजापूर हे आपल्या राहत्या घरासमोर 30 लि. अवैध गावठी दारु (किं.अं. 1,800 ₹) बाळगले असतांना आढळले.

* 1)हरिबा चांगदेव राठोड 2)राजेंद्र लोभा राठोड, दोघे, रा. दिपकनगर तांडा, तुळजापूर हे राहत्या तांडा शिवारात दोन वेगवेगळ्या ठिकाणी एकत्रीत अवैध गावठी दारु निर्मीतीचा 600 लि. द्रवपदार्थ (किं.अं. 12,000 ₹) बाळगले असतांना आढळले.

*उद्देश फुलचंद मस्के, रा. देवसिंगा, ता. तुळजापूर हे आपल्या राहत्या घराजवळ 10 लि. अवैध गावठी दारु (किं.अं. 600 ₹) बाळगले असतांना आढळले.

* किसन मनोहर सिध्दगणेश, रा. सिंदफळ, ता. तुळजापूर हे गावातील शिवारात देशी दारुच्या 30 बाटल्या व 80 लि. अवैध गावठी दारु (किं.अं. 5,560 ₹) अवैधपणे बाळगले असतांना आढळले.

* पो.ठा. ढोकी: रंगा बिरु शिंदे, रा. ढोकी, ता. उस्मानाबाद हे दत्तनगर, ढोकी येथे 15 लि. अवैध गावठी दारु (किं.अं. 750 ₹) बाळगले असतांना आढळले.

* पो.ठा. आंबी: सिचन महादेव गायकवाड, रा. हिंगणगाव (खु.), ता. परंडा हे आपल्या राहत्या घराजवळ देशी दारुच्या 15 बाटल्या (किं.अं. 780 ₹) अवैधपणे बाळगले असतांना आढळले.

* मधुकर विश्वनाथ गरजमल, रा. चिंचपुर (खु.), ता. परंडा हे गावातील ‘लक्ष्मी किराणा’ दुकानाच्या बाजूस देशी दारुच्या 12 बाटल्या (किं.अं. 624 ₹) अवैधपणे बाळगले असतांना आढळले.

* पो.ठा. शिराढोन: 1)सुनिता पवार 2) तात्या चंदर पवार, दोघे रा. मंगरुळ, कळंब हे दोघे आपापल्या राहत्या घराजवळ अनुक्रमे 10 लि. अवैध गावठी दारु व देशी- विदेशी दारुच्या 33 बाटल्या (एकुण किं.अं. 3,004 ₹) अवैधपणे बाळगले असतांना आढळले.

* वंदना काळे, रा. लोहटा (पु.), ता. कळंब या गावशिरात 10 लि. अवैध गावठी दारु (किं.अं. 650 ₹) बाळगल्या असतांना आढळल्या.

* पो.ठा. कळंब: सचिन देवीदास वाघमारे, रा. डिकसळ, ता. कळंब हे गावातील चौकात देशी दारुच्या 15 बाटल्या (किं.अं. 780 ₹) अवैधपणे बाळगले असतांना आढळले.

* परमेश्वर सायबा शिंदे, रा. टोकणी पारधी पिढी, कोठाळवाडी, ता. कळंब हे राहत्या पारधी पिढी येथे 15 लि. अवैध गावठी दारु (किं.अं. 750 ₹) बाळगले असतांना आढळले.

* अगरचंद्र दत्तात्रय कोकाटे, रा. हावरगाव, ता. कळंब हे गावातील ‘राजे हॉटेल’ येथे देशी- विदेशी दारुसह बियरच्या 87 बाटल्या (किं.अं. 6,626 ₹) अवैधपणे बाळगले असतांना आढळले.

* पो.ठा. भुम: नवनाथ कल्याण वरवडे, रा. शिवाजी नगर, भुम हे भुम येथील साहिल पेट्रोलियम केंद्राजवळील पत्रा शेडमध्ये विदेशी दारुच्या 5 बाटल्या (किं.अं. 1,000 ₹) अवैधपणे बाळगले असतांना आढळले.

* अजित मोहन कांदे, रा. कसबा, भुम हे परंडा येथील मोरया हॉटेल बाजूच्या पत्रा शेडमध्ये देशी दारुच्या 15 बाटल्या (किं.अं. 900 ₹) अवैधपणे बाळगले असतांना आढळले.

* पो.ठा. परंडा: यशोदाबाई पवार, रा. परंडा या राहत्या घराजवळ 4 लि. अवैध गावठी दारु व देशी दारुच्या 13 बाटल्या (एकुण किं.अं. 956 ₹) अवैधपणे बाळगल्या असतांना आढळल्या.

* गोकुळ जालिंदर पवार, रा. कोटला मैदान, परंडा हे राहत्या भागत 10 लि. अवैध गावठी दारु (किं.अं. 600 ₹) बाळगले असतांना आढळले.

* 1)लालासाहेब ब्रम्हदेव जाधव 2)नाना मारुती जाधव, दोघे रा. देवळाली, ता. भुम हे गावातील दोन वेगवेगळ्या ठिकाणी एकत्रीत देशी दारुच्या 29 बाटल्या (किं.अं. 1,740 ₹) अवैधपणे बाळगले असतांना आढळले.

* पो.ठा. उमरगा: खंडु धोंडीबा शिंगनाळे, रा. नाईचाकुर, ता. उमरगा हे आपल्या राहत्या पत्रा शेडसमोर देशी दारुच्या 15 बाटल्या (किं.अं. 780 ₹) अवैधपणे बाळगले असतांना आढळले.

* भिम माणिक गुजे, रा. तुरोरी, ता. उमरगा हे आपल्या राहत्या घरासमोर 40 लि. अवैध गावठी दारु (किं.अं. 2,600 ₹) बाळगले असतांना आढळले.

* काशीनाथ वसंत मंडले, रा. कराळी, ता. उमरगा हे आपल्या राहत्या घरासमोर 40 लि. अवैध गावठी दारु (किं.अं. 2,500 ₹) बाळगले असतांना आढळले.

* लिंबा गोपा राठोड, रा. औराद फाटा, ता. उमरगा हे आपल्या राहत्या पत्रा शेडसमोर देशी दारुच्या 16 बाटल्या (किं.अं. 832 ₹) अवैधपणे बाळगले असतांना आढळले.

* पो.ठा. लोहारा: विमलबाई उत्तम राठोड, रा. होळीतांडा, ता. लोहारा या राहत्या भागात 19 लि. अवैध गावठी दारु (एकुण किं.अं. 1,900 ₹) अवैधपणे बाळगल्या असतांना आढळल्या.

* गोरोबा गुन्याबा सुरवसे, रा. कानेगाव, ता. लोहारा हे गावातील तेलंग रोहित्रामागे देशी दारुच्या 15 बाटल्या (किं.अं. 900 ₹) अवैधपणे बाळगले असतांना आढळले.

* पो.ठा. वाशी: भाग्यश्री नवनाथ शिंदे, रा. चिरकाड वस्ती, पारा, ता. वाशी या राहत्या घरामागे 9 लि. अवैध गावठी दारु (एकुण किं.अं. 680 ₹) बाळगल्या असतांना आढळल्या.

* सज्जन पांडुरंग गाडे, रा. पिंपळगाव (लिंगी), ता. वाशी हे गावातील आपल्या टपरीमध्ये 10 लि. अवैध गावठी दारु (किं.अं. 900 ₹) बाळगले असतांना आढळले.

* सिताबाई दादा काळे, रा. सरमकुंडी, ता. वाशी या आपल्या राहत्या घरामागे देशी दारुच्या 9 बाटल्या (किं.अं. 468 ₹) अवैधपणे बाळगल्या असतांना आढळल्या.

* आनंद सुरेश आंधारे, रा. आंद्रुड, ता. भुम हे स्वरा हॉटल च्या पाठीमागे देशी दारुच्या 10 बाटल्या (किं.अं. 520 ₹) अवैधपणे बाळगले असतांना आढळले.

* पो.ठा. तामलवाडी: संजय हुसेनी शेरखाने, रा. सोलापूर हे माळुंब्रा येथील ‘शिवनेरी ढाबा’ येथे देशी- विदेशी दारुच्या 23 बाटल्या (किं.अं. 1,980 ₹) अवैधपणे बाळगले असतांना आढळले.

* मैनाबाई शंकर पवार, रा. सावरगाव, ता. तुळजापूर या गाव शिवारात 5 लि. अवैध गावठी दारु (किं.अं. 425 ₹) बाळगल्या असतांना आढळल्या.

* पो.ठा. मरुम: दिगंबर शिवाप्पा देडे, रा. मुरुम हे गावातील बसवेश्वर चौकात 10 लि. अवैध गावठी दारु (किं.अं. 520 ₹) बाळगले असतांना आढळले.

* पो.ठा. उस्मानाबाद (श.): सुरेश प्रल्हाद चव्हाण, रा. पारधी पिढी, उस्मानाबाद हे राहत्या वस्तीवर अवैध गावठी दारु निर्मीतीचा 1,000 द्रवपदार्थ (किं.अं. 40,000 ₹) बाळगले असतांना आढळले.

* पो.ठा. बेंबळी: सुनिल दशरथ कदम, रा. आंबेवाडी, ता. उस्मानाबाद हे गावातील चौकात देशी दारुच्या 14 बाटल्या (किं.अं. 728 ₹) अवैधपणे बाळगले असतांना आढळले.

* पो.ठा. नळदुर्ग: सुनिल विश्वनाथ कोळी, रा. हगलुर, ता. सोलापूर हे आरळी (बु.) येथील रानमळा ढाब्याजवळ देशी दारुच्या 12 बाटल्या (किं.अं. 720 ₹) अवैधपणे बाळगले असतांना आढळले.

* विशाल विठ्ठल मुगळे, रा. नळदुर्ग हे मुर्टा फाटा येथील एका झाडाखाली देशी दारुच्या 9 बाटल्या (किं.अं. 468 ₹) अवैधपणे बाळगले असतांना आढळले.

* पो.ठा. आनंदनगर: सुनिता सोमनाथ काळे, रा. सांजा, ता. उस्मानाबाद या आपल्या राहत्या घरासमोर 15 लि. अवैध गावठी दारु (किं.अं. 650 ₹) बाळगल्या असतांना आढळल्या.

(कळंब येथील दारु छाप्यातील जप्त दारु.)

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा (0)
To Top