बेपत्ता- अपहृत व्यक्तींचा शोधकामी उल्लेखनीय कार्य करणाऱ्या पोलीस अंमलदारांचा सत्कार

0



बेपत्ता- अपहृत व्यक्तींचा शोधकामी उल्लेखनीय कार्य करणाऱ्या पोलीस अंमलदारांचा सत्कार.

Osmanabad :- Osmanabadnews : कौटुंबीक वाद, प्रेमसंबंध इत्यादी कारणांनी बेपत्ता झालेल्या स्त्री- पुरुष तसेच अपहृत अल्पवयीन मुले- मुली यांचा शोध घेतांना आपल्या कुटूंबातील सदस्य बेपत्ता झाले आहेत अशी जाणीव मनात ठेउन त्यांचा शोध घेण्यात यावा, मानव तस्करी झाली असु शकते यांसारख्या शक्यता पडताळून पाहाव्यात. त्यास अनुसरुन मा. पोलीस अधीक्षक श्री राज तिलक रौशन यांच्या संकल्पनेतून प्रत्येक पोलीस ठाण्यात ‘मिसींग पर्सन डिटेक्शन स्क्वॉड’ तयार करण्यात आले आहेत. यात सामाजिक माघ्यमे, आधुनिक माहिती तंत्रज्ञान व गोपनीय खबर यांचा वापर करुन बेपत्ता शोध घेतला जोतो. त्यातुनच सन- 2010 ते 2020 या कालावधीतील एकुण 1,037 बेपत्ता व्यक्ती व बेपत्ता अल्पवयीन व्यक्ती शोधण्यात- तपासण्यात आल्या. यात उल्लेखनिय कार्य केल्याबद्दल मा. पोलीस अधीक्षक श्री राज तिलक रौशन यांच्या हस्ते पोलीस अंमलदार- 1)पोना- आण्णासाहेब भोसले 2)पोकॉ- बाबासाहेब कांबळे 3)सुनिल तारळकर 4)नासीर सय्यद 5)बीभीषन कुंभार 6)गजानन साबदे 7)चव्हाण 8)वाघमारे यांना प्रशस्तीपत्र व बक्षीस देउन पोलिस   मुख्यालय येथेे गौरविण्यात आले आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा (0)
To Top