नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांनीघेतले तुळजाभवानी मातेचे दर्शन

0

नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांनी घेतले तुळजाभवानी मातेचे दर्शन

उस्मानाबाद, दि.17( प्रतिनिधी ) : राज्याचे नगरविकास व सार्वजनिक बांधकाम  मंत्री एकनाथ शिंदे यांनी  आज  तुळजाभवानी मातेचे दर्शन घेतले.  यावेळी मंदीर संस्थानच्यावतीने  उपविभागीय अधिकारी योगेश खरमाटे यांनी  श्री . शिंदे यांचा देवीची प्रतिमा  देऊन सत्कार केला.
यावेळी खासदार ओमप्रकाश राजेनिंबाळकर, आमदार कैलास घाडगे-पाटील, आमदार ज्ञानराज चौगुले, नगराध्यक्ष मकरंदराजे निंबाळकर, धार्मिक व्यवस्थापक सिध्देश्वर इंथुले, जनसंपर्क अधिकारी नागेश शितोळे व मंदीरातील कर्मचारी उपस्थित होते.
****

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा (0)
To Top