Osmanabad : शहरातील दुकानफोडीतील 4 आरोपी मालासह अटकेत स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई

0



उस्मानाबाद शहरातील दुकानफोडीतील 4 आरोपी मालासह अटकेत स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई 

उस्मानाबाद :- शहरातील माणिक चौक येथील कर्तव्य कॉम्प्लेक्स या दुकानाच्या शटरचे कुलूप दि. 11.01.2021 रोजी रात्री 02.00 वा. सु. अज्ञाताने तोडून आतील विविध कंपन्यांचे तयार कपडे, सदरे- विजारी, संगीत उपकरणे असा एकुण 39,750 ₹ चा माल चोरुन नेला होता. यावरुन आनंदनगर पो.ठा. येथे गुन्हा क्र. 12 / 2021 हा भा.दं.सं. कलम- 457, 380 अंतर्गत दाखल आहे.

            गुन्हा तपासात स्था.गु.शा. चे पोनि- श्री गजानन घाडगे यांच्या मार्गदर्शनाखालील सपोनि- श्री निलंगेकर, पोना- कावरे, पोकॉ- अशोक ढगारे, दिपक लाव्हरेपाटील, पोकॉ- सोनवणे यांच्या पथकाने परिसरातील सीसीटीव्ही छायाचित्रणाचा अभ्यास सुरु केला. अखेर हा गुन्हा उस्मानाबाद येथील मणिष भेंडेगावे उर्फ महाबळेश्वर, रा. काकानगर व आतिश शिंदे, रा. शिंगोली यांसह दोन अल्पवयीन युवकांनी (विधीसंघर्षग्रस्त बालक) केला असल्याचे समजले. पथकाने त्यांना  16 जानेवारी रोजी शहरातून ताब्यात घेतले. गुन्हा करण्यासाठी वापरलेली विनाक्रमांकाची यामाहा मोटारसायकल व ॲक्टीव्हा स्कुटर क्र. एम.एच. 25 एटी 3788 सह चोरी केलेला उपरोक्त नमूद माल जप्त केला आहे. तसेच उर्वरीत कार्यवाहिस्तव आनंदनगर पो.ठा. च्या ताब्यात दिले आहे. 

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा (0)
To Top