वसंतदादा नागरी सहकारी बँकेच्या ठेवीदारांना केवायसी कागदपत्र देण्याचे आवाहन
Osmanabad , दि.09 :- वसंतदादा नागरी सहकारी बँकेच्या ठेवीदारांच्या ठेवीबाबत डिपॉझिट इन्शुरंस ॲण्ड ग्यारंटी कार्पोरेशन यांच्याकडे ठेवी बाबतचा प्रस्ताव सादर करण्यात येणार आहे. हा प्रस्ताव मंजूर झाल्यानंतर ठेवीदाराच्या ठेवीच्या रकमा नियमानुसार परत करण्यात येतील. त्यासाठी ठेवीदारांनी केवायसी कागदपत्र सादर करावित, असे आवाहन बँकेचे अवसायक व्ही.एस. जगदाळे यांनी केले आहे.
प्रस्ताव सादर करण्यासाठी ठेवीदारांनी आपली केवायसी कागदपत्रे देण्याची (नवीन पासपोर्ट साईज फोटो, आधार कार्ड, पॅन कार्ड, रहिवासी पुरावा व इतर बँकेच्या पासबुकाच्या पहिल्या पानाची छायांकित प्रत) मुदत 28 फेब्रुवारी 2021 पर्यंत राहील. अशी माहिती जिल्हा माहिती कार्यलयातुन देण्यात आली आहे