पुजा चव्हाण आत्महत्या प्रकरणात बंजारा समाजाची नाहक होणारी बदनामी थांबवावी यासाठी जिल्हाधिकार्यांना निवेदन..
उस्मानाबाद :- पुजा चव्हाण आत्महत्या प्रकरणात बंजारा समाजाची व कोणतीही चौकशी होण्यापुर्वीच बंजारा ओबीसी बहुजन समाजाच्या राजकीय नेतृत्वाची नाहक होणारी बदनामी थांबविणे बाबत मुख्यमंत्री , उपमुख्यमंत्री , गृहमंत्री यांना जिल्हाधिकारी उस्मानाबाद यांच्या द्वारे बंजारा समन्वय समितीने
निवेदन दिले आहे.
बंजारा समन्वय समिती निवदेनात असे सांगितले आहे ज्या पध्दतीने राज्यातील भाजपचे काही नेते चौकशीपुर्वीच व अंतिम निष्कर्ष येण्यापुर्वीच बंजारा ओ . बी . सी . बहुजन समाजातील मंत्री ना . संजय राठोड यांना आरोपी म्हणुन व प्रसार माध्यमात बंजारा बहुजन समाजाला बदनाम करण्यावे कट कारस्थान केले जात आहे . या घडयंत्रावे समाजाकडुन आम्ही निषेध नोंदवितो , पुजा चव्हाण या तरुणीच्या आत्महत्येबद्दल संपुर्ण समाजाला अति दुःख आहे . समाज माध्यमात जी काही उलट - सुलट चर्चा होत आहे , ती अत्यंत निंदणीय आहे , ज्या तरुणीवी पुणे येथे आत्महत्या झाली आहे . तिच्या कुटुंबीयांनी आज पर्यंत तशी मनुष्यवधाची किंवा हत्येबाबत कसलीही तक्रार दिलेली नाही . या प्रकरणातील ऑडीओ क्लिप देखील संशयास्पद आहे शिवाय राजकीय स्वार्थापोटी या प्रकरणात ईलेक्ट्रॉनिक प्रसार माध्यमात समाजाला व वनमंत्री ना . राठोड यांना बदनाम करण्याचे कारस्थान सुरु असल्याचे दिसुन येते . व त्यामुळे समाजात प्रचंड अस्वस्थता आहे , भाजपाला नेमका या प्रकरणाचा पुळका आजव कसा काय आला ? या मागे त्यांचे मनसुबे सुध्दा तपासणे गरजेचे आहे , यापुर्वी औरंगाबाद येथील सिमा राठोड , पुण्यातील योगेश राठोड खुन प्रकरण शिवाय साहित्यीक भालचंद्र नेमाडे यांनी आपल्या हिंदु जगण्याचे समृद अडगड या कादंबरीत बंजारा व इतर समाजातील महिलांविषयी केलेले अक्षेपार्ह व असभ्य लेखन तसेच बंजारा समाजातील प्रश्नांवर आजवर कधीही आवाज उठविले नाहीत . आधुनिक महाराष्ट्राचे शिल्पकार , विमुक्त मटक्या बहुजनांचे दैवत मानले जाणारे वसंतराव नाईक साहेबांविषयी भाजपाला आजवर कधी आपुलकी दावता आली नाही . मग अवानक पुजा चव्हाण या प्रकरणात समाज बदनाम होईल असे षडयंत्र करणे है सुध्दा तितकेच संशयास्पद आहे ., या अत्यंत संवेदनशील प्रकरणात एकामागे एक ऑडीओ क्लिप्स कोतुन आणि कोणाच्या षडयंत्राने व्हायरल झाल्यात त्याचा देखील तपास होणे आवश्यक आहे . महोदय राज्यातील राजकारणात बंजारा ओ बी , सी . बहुजन नेतृत्व संपवुन यवतमाळ व खास करून विदर्भातील काही पक्ष आपली राजकीय पोळी भाजण्यासाठीव या प्रकरणात खुप मोठे षडयंत्र रचण्याचा प्रयत्न करीत असल्याचे दिसुन येत आहे . त्यामुळे ना . संजय राठोड यांच्यावर भाजपने राजकीय हेतुने सुरु केलेल्या षडयंत्राची शहानिशा झाल्याशिवाय कोणतीही कार्यवाही करण्यात येऊ नये , तसेच ईलेक्ट्रॉनिक मिडीयाने संबंधीत प्रकरणात जास्तीचा हस्तक्षेप करणे टाळावे . भाजपाकडुन राजकीय षडयंत्र रचून बंजारा ओ . बी . सी . बहुजन समाजातील नेतृत्वाला संपविण्याचा प्रयत्न चालविला जात आहे . याची निरपेक्ष चौकशी करुन त्यांना धडा शिकवण्यात यावा अन्यथा महाराष्ट्रातील संपुर्ण बंजारा समाज या अन्यायाविरुद्ध रस्त्यावर उतरल्याशिवाय राहणार नाही . तरी कृपया पुजा चव्हाण आत्महत्या प्रकरणात समाज माध्यमात होणारी बंजारा समाजाची व संबंधीत कुटुंबीयांची कोणतीही तकार नसताना व योग्य चौकशीपुर्वीच बंजारा ओ . बी . सी . राजकीय नेतृत्वाची नाहक होत असलेली बदनामी तसेच मृत्युपश्चात पुजा चव्हाण व तिच्या कुटुंबीयांची बदनामी तसेच बंजारा समाजाची बदनामी थांबवण्यात यावी बंजारा समन्वय समिती उस्मानाबाद यांच्या निवेदनाद्वारे विनंती करण्यात आली आहे
निवेदनावर उत्तम राजाराम चव्हाण , गुलाबराव टोपाजी जाधव , प्रकाश चव्हाण , शशिकांत राठोड , शेषेराव चव्हाण सर , नेताजी राठोड, डॉ. सुरज चव्हाण, विजय राठोड , विद्यानंद राठोड, हरीश जाधव ,अविनाश चव्हाण, दिलीप आडे ,अशोक जाधव, मोहन राठोड ,सचिन राठोड ,सचिन जाधव , एँड .किरण चव्हाण ,एँड परमेश्वर चव्हाण , राज राठोड ,शहाजी चव्हाण, प्रवीण चव्हाण ,अरुण राठोड ,सतीश पवार , राजु आडे , दयानंद राठोड, वसंत चव्हाण ,रामदास आडे ,नामदेव चव्हाण, प्रभाकर चव्हान , राजूदास पवार , इत्यादींच्या निवेदनावर स्वाक्षऱ्या आहेत