Osmanabad शहरातील अतिक्रमण काढुनच रस्ते नाल्या व शहरातील मोकाट जनावरांचा बंदोबस्त करण्यासाठी जिल्हा बांधकाम विभाग व नगर परिषद कडे फुक संघटनेचे निवेदन..
उस्मानाबाद :- शहरातील बिएसएनएल कार्यालय ते वरुडा रोड व अन्य ठिकाणीही रस्त्याचे काम चालु असुन हा रस्ता नियमांचे पालन करुन होत नाही तर नागरिका़ंनी केलेल्या अतिक्रमणाला संरक्षण देवुन होत आहे,अशा ठिकाणची अतिक्रमणे काढून रस्ता नाल्या होण्याकरिता बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता मा.झगडे यांना लेखी निवेदन दिले आहे,मा.झगडे यांच्याशी चर्चा करीत असतांना त्यांनी भविष्यात उद्भवणा-या समस्यांवर व रस्ता नालीच्या जवळ पाईप लाईन टाकल्यास त्यातुन पाणी पाईप,व इतर केबल वायर टाकण्यास मदत होईल अशी संकल्पना मांडली..तसेच शहरातील मोकाट कुत्री जनावरे यांचा बंदोबस्त करावा,फळे भाज्या विक्रेते,फेरीवाले यांना त्यांच्या जागा हद्द ठरवुन देणे, त्यांचे पालन नाही झाले तर दंडात्मक कारवाई करणे,शहरातील मेन ठिकाणी भर रस्त्यात लावणा-या बेशिस्त वाहनांमुळे अपघात व रहदारीला अडथळा निर्माण होतो,यावरती नगर प्रशासन यांनी नियोजन केले पाहिजे याबाबतचे निवेदन मुख्याधिकारी व नगराध्यक्ष यांना देण्यात आले आहे,नगराध्यक्ष मकरंदभैय्या राजे निंबाळकर यांच्याशी शहरातील विविध समस्यांवर चर्चा करीत असतांना माजी उपनगराध्यक्ष सुरजभैय्या साळुंखे, नगरसेवक राजभाऊ पवार.घोणे साहेब होते.नगराध्यक्ष मकरंद भैय्या राजे निंबाळकर यांनी मोकाट जनावरांचा बंदोबस्त लवकरच करण्यात येणार असुन मोकाट कुत्र्यांना निर्जंतुक विषाणू लसीकरण मोहीम राबविण्यात येणार आहे. नागरिकांनीही आपले कर्तव्य म्हणुन जबाबदारी घेतली पाहिजे अशा अन्य बाबींवर चर्चा केली.निवेदन देतांना फुक संघटनेचे सचिव धर्मवीर कदम,अ.लतिफ अ.मजीद,गणेश रानबा वाघमारे,मुकेश नायगावकर,पि आर गपाट,शहाजी कापसे,राजु गरड,भागवत हिंगमिरे,फेरोज खान पठाण,मौला मनुवर अन्य इतर उपस्थित होते.