तुळजापूर नगर परिषद मुख्याधिकारी यांच्यावर गुन्हा दाखल करा - लहुजी शक्ती सेनेचे बेमुदत धरणे आंदोलन

0

तुळजापूर नगर परिषद मुख्याधिकारी यांच्यावर गुन्हा दाखल करा - लहुजी शक्ती सेनेचे बेमुदत धरणे आंदोलन

लहुजी शक्ती सेनेच्या वतीने तुळजापूर नगर परिषद मुख्याधिकारी यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात यावा यासह इतर मागण्यांसाठी बेमुदत धरणे आंदोलनास सुरुवात..

तुळजापूर नगर परिषद मध्ये पात्र अनुकंपाधारक यानां कायम सेवेत समावेश करावा लागतो आणि इतरही प्रलंबीत प्रश्नावर काम न करता लहुजी वक्ती सेनेस बदनाम करण्याचे शडयंत्र रचून जातीय भावना दुखावण्याचा प्रयत्न आशिष लोकरे,दत्ता साळुंखे, श्रीमती पी.पी बरुरकर यांनी केला आहे. सदरील सर्व संबंधीतावर अनु.जाती प्रतिबंधक कायद्यानुसार गुन्हे दाखल करावेत,छत्रपती शिवाजी महाराज आणि साहित्य रत्न अण्णाभाऊ साठे यांचे तुळजापूर शहरात पुर्णाकृती पुतळे लवकरात लवकर झालेच पाहिजे ह्या व इतर १८ मागणीसाठी लहुजी वक्ती सेनेच्या वतीने (दि.१७)पासून तुळजापूर तहसील कार्यालय समोर क्रांतिकारक लहुजी वस्ताद साळवे यांच्या स्मृतिदिनानिमित्त प्रतिमेस पुष्पहार अर्पण करुन बेमुदत धरणे आंदोलन सुरु करण्यात आले आहे.आंदोलनस्थळी लहुजी शक्ती सेनेचे शिवाजीभाऊ गायकवाड,नगरसेवक किशोर साठे,इंद्रजीत सुरवसे,संतोष राम हाणमंते, कुंडलीक भोवाळ,लक्ष्मण गायकवाड, लक्ष्मण क्षीरसागर, सुर्यकांत भीसे, अमोलभाऊ सगट,सुरज सगट,नितीन शिंदे,अजित देडे,संजय गायकवाड,अविनाश कांबळे,अविनाश अभिमन्यू रसाळ,बालाजी उपरे,पांडूरंग कदम,विकास दादाराव गायकवाड, संतोष गायकवाड सांजा,बाळासाहेब कांबळे जिल्हा संघटक उस्मानाबाद, दिपक सहाने कळंब,रविराज साठे,संतोष मोरे,सुदर्शन रोडगे,सुरज कांबळे,सर्जेराव शिंदे,वैभव एडके,सुरेश शिंदे,संभाजी कांबळे,आदी लहुजी शक्ती सेनेचे प्रमुख पदाधिकारी, कार्यकर्ते तसेच सामाजिक नेते उपस्थित होते. यावेळी बळीराजा पाटीचे जिल्हाध्यक्ष तात्यासाहेब रोडे, तुळशीराम देडे कार्यकर्त्यासह यांनी लहुजी शक्ती सेनेच्या वतीने तुळजापूर न.प.संबंधात बेमुदत धरणे आंदोलनास सुरुवात केली आहे यांना पाठींबा दिला आहे.

बातमी संकलन - रुपेश डोलारे , तुळजापूर 

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा (0)
To Top