Osmanabad : चोरीतील दागीन्यासह दोन आरोपी ताब्यात , स्थानिक गुन्हे शाखाची कारवाई

0


चोरीतील दागीन्यासह दोन आरोपी ताब्यात 

उस्मानाबाद : तेलंगण राज्यातील नविन केतावत हे 13 फेब्रुवारी  रोजी रात्री 03.00 वाजता उस्मानाबाद ते बीड असे कारने सहकुटुंब जात होते. दरम्यान इंदापुर फाटा परीसरात त्यांच्या कार समोर अज्ञाताने काहीतरी वस्तु फेकली असता त्यावस्तुस चुकविण्याच्या नादात चालकाचे वाहना वरील नियंत्रण सुटुन कार रस्त्यापलीकडील खड्यात जावुन पलटली. या अपघातात कार मधील पाचही लोक जखमी झाले असता बाजुच्या अंधारातुन 20-25 वयोगटाचे चार अनोळखी तरुण तेथे आले. जखमी लोकांना मदत करण्याच्या बहाण्याने त्यांनी कार मधील स्त्री-पुरुषांच्या अंगावरील दागीने हिसकावण्यास सुरुवात केली. यात प्रवाशांनी विरोध करताच नमुद तरुणांनी प्रवाशांना लाथा-बुक्याने व दगडाने मारहाण करुन जखमी केले व प्रवाशांकडील 75 ग्रॅम सोन्याचे दागीने लुटुन नेले होते. यावरुन वाशी पो. ठा. येथे गु. र. क्र. 69 / 2021 हा भा.दं.सं. कलम- 394,34 अंतर्गत गुन्हा तपासावर आहे.

गुन्हा तपासादरम्यान स्थानिक गुन्हे शाखाच्या पोनि-घाडगे यांच्या मार्गदर्शनाखाली  पोउपनि- श्री माने, पोकॉ-आरसेवाड, मरलापल्ले, ठाकुर, खोत  यांच्या पथकाने दोन अल्पवयीन बालकांस 16 फेब्रुवारी रोजी ताब्यात घेउन त्यांच्या ताब्यातून चोरीतील 15 ग्रॅम सोन्याचे मणी जप्त केले असून त्यांना पुढील तपासकामी वाशी पोलीसांच्या ताब्यात दिले आहे

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा (0)
To Top