तुळजापूर : लहुजी शक्ती सेनेच्या बेमुदत धरणे आंदोलकांना रात्री पावसाने झोडपले

0

तुळजापूर : लहुजी शक्ती सेनेच्या बेमुदत धरणे आंदोलकांना रात्री पावसाने झोडपले

तुळजापूर :- अवकाळी वादळ -वारा पावसाच्या तडाख्याने आंदोलनकर्त्ये रात्री झोपेत असतानां तंबू अचानक अंगावर  कोसळला, काही वेळ कार्यकार्ये निसर्गाच्या अपत्तीस भयभीत झाले होते.मात्र सर्व कार्यकर्ते सुस्थितीत असून आंदोलनाच्या स्टेजवर ठाण माडून आहेत.
लहुजी शक्ती सेना उस्मानाबाद जिल्ह्याच्या वतीने जिल्हाध्यक्ष शिवाजी भाऊ गायकवाड यांच्या नेतृत्वाखाली तुळजापूर नगर परिषद मुख्याधिकारी आशिष लोकरे,स्वच्छता निरीक्षक दत्तात्रय साळुके, लिपीक पी.पी.बरुरकर यानीं मागासवर्गीय अनुकंपाधारकावर अन्याय केला असून लहुजी बाबा व लहुजी शक्ती सेना तसेच सोमनाथ भाऊ कांबळे यानां अवमानकारक शब्दात उल्लेख करुन समाजाच्या भावना दुखावत शासनाची दिशाभूल केली आहे. त्यामुळे नगर परिषद च्या संबंधीत अधिकारी व कर्मचारी यांचेवर अट्रोसिटी कलमान्वये गुन्हा दाखल करावा,ह्या आणि विविध मागण्यांसाठी गेल्या तीन दिवसांपासून तुळजापूर तहसील कार्यालय समोर बेमुदत धरणे आंदोलन सुरु आहे. सदरील आंदोलनकर्त्यास(दि.१८)वार शुक्रवार रोजी रात्री अचानक अवकाळी पावसाच्या जोरदार तडाक्याने झोडपले आहे. सध्या नैसर्गिक वातावरण अवकाळी बनले असून किती दिवस हे असे राहील, कमी होईल किंवा वाढ होईल सांगता येत नाही. घडलेल्या स्थतीचा सामना करत भर पावसामध्ये आंदोलकांनी आंदोलन स्थळ सोडले नसून प्रशासनाने आंदोलनाची तात्काळ दखल घेण्याची गरज निर्माण झाली आहे.
      यावेळी बालाजी गायकवाड, सुरज सगट ,संभाजी कांबळे ,अमोल सगट, लक्ष्मण क्षीरसागर, संतोष मोरे,सूर्यकांत भिसे, पुंडलिक भोवाळ, लक्ष्मण गायकवाड, दीपक रोडगे, मारुती क्षीरसागर, अमोल क्षीरसागर, गणेश शिंदे, दिलीप गायकवाड, सर्जेराव शिंदे, सुभाष गव्हाणे, मुकेश देडे, पांडुरंग कदम, विकास गायकवाड, विकी मोरे, यांच्यासह इतर कार्यकर्त्यांचा समावेश आहे.
तुळजापूर नगरपरिषदेचे मुख्याधिकारी डॉ. आशिष लोकरे यांच्या मालमत्तेची चौकशी करावी त्यांनी लहुजी वस्ताद यांचा केलेला हवामान तसेच दत्तात्रेय साळुंखे व प्रफुल्लता बरूरकर यांनी प्रदेशाध्यक्ष कांबळे यांच्यावर निराधार आरोप करून त्यांना बदनाम करण्याचा केलेला प्रयत्न या विरोधात लहुजी शक्ती सेना आक्रमक होऊन आंदोलन करीत आहेत.तुळजापूर तहसील कार्यालयासमोर सुरु असलेल्या आंदोलनास मोठा प्रतिसाद मिळत असून दोषींवर कारवाई केल्याशिवाय उपोषण सोडणार नाही असा निर्धार लहुजी शक्ती सेनेच्या वतीने करण्यात आला आहे,
लहुजी शक्ती सेनेच्या वतीने गेल्या महिनाभरापासून तुळजापूर नगर परिषदेच्या मुख्याधिकारी आणि इतर दोन कर्मचारी विरोधात तीव्र आंदोलन होत असताना जिल्हाधिकारी डॉ. कौस्तुभ दिवेगावकर यांनी यामध्ये लक्ष घालण्याची मागणी होत आहे.


बातमी संकलन :-  रूपेश डोलारे , तुळजापूर

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा (0)
To Top