शिवजयंती सोहळा निमित्त तुळजापूर शहरातील मुस्लिम बांधवाकडुन शिवमुर्तीची प्रतीष्ठापना

0
भवानी प्रतिष्ठान, तुळजापूर आयोजित शिवजयंती सोहळा निमित्त तुळजापूर शहरातील मुस्लिम बांधवाकडुन शिवमुर्तीची प्रतीष्ठापना करण्यात आली

तुळजापूर :- आज शिवजन्मोस्तव निमित्त शुक्रवार पेठ येथील भवानी प्रतिष्ठान, तुळजापूर शिवजयंती समीती तर्फे शहरातील सर्व मुस्लिम बांधवांना शिवमुर्ती प्रतीष्ठापना व शिव-आर्तीचा मान देण्यात आला यावेळी प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष शशिकांत नवले यांनी सर्व मुस्लिम बांधवाचा  मानाचा फेटा व श्रीफळ देऊन स्वागत केले. 

शिवरायांनी अठरापगड जातींच्या मावळ्यांना सोबत घेउन स्वराज्य स्थापन केले यामध्ये मुस्लिम मावळे देखील होते त्याच प्रेरणेतून समाजात एकात्मतेचा संदेश जावा या उद्देशाने हा अनोखा मान मुस्लिम मावळ्यांना देण्यात आला,यावेळी लालासाहेब तांबोळी,अमीर भाई शेख, मसूद शेख, महंमद शेख, आरिफ बागवान, तौफिक शेख,युसुफ भाई शेख, ताजोद्दिन शेख,असलम तांबोळी,अजीज सय्यद,कलीम शेख,अशपाक शेख,जमीर शेख, शाहरूख बागवान,आफदाब नदाफ, व्हेज शेख, अशपाक सय्यद, मुबारक शेख व अनेक मुस्लिम बांधव उपस्थित होते, तसेच सोहळा समीतीचे अध्यक्ष सागर पाटिल, उपाध्यक्ष अक्षय पेंदे,कोषाध्यक्ष विनायक सीरसट, सहकोषाध्यक्ष सयाजी चव्हाण,सचिव उदय आडेकर,सह-सचीव विकास चोपदार, बाळासाहेब पेंदे,धिरज कदम, सोमनाथ क्षीरसागर,प्रसाद पेंदे, विशाल निंबाळकर,आकाश चोपदार,विकास सोंजी,धनाजी घोगरे,सागर भोसले, दिग्विजय धुमाळ सर्व सदस्य उपस्थित होते.

बातमी संकलन :-  रूपेश डोलारे तुळजापूर उस्मानाबाद

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा (0)
To Top