तुळजापूर नगर परिषदेमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेचे पूजन , अभिवादन..

0
तुळजापूर :- दिनांक 19 फेब्रुवारी 2021रोजी  छत्रपती शिवाजी महाराजांच्या 391 व्या जयंती निमित्ताने तुळजापूर नगर परिषदेमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेचे पूजन नगराध्यक्ष श्री.सचिन ज्ञानोबा रोचकरी व मुख्याधिकारी आशिष लोकरे तसेच
इतर सर्व सदस्य,अधिकारी,कर्मचारी यांच्या उपस्थितीमध्ये सकाळी करण्यात आले.

त्यानंतर छत्रपती शिवाजी महाराज ,बाबासाहेब आंबेडकर व छत्रपती संभाजी महाराजांच्या पुतळ्यास नगरपरिषदेच्या वतीने पुष्पहार अर्पण करण्यात आला. महाराजांच्या जयंतीचे औचित्य साधून नगरपरिषद तुळजापूर च्या वतीने राणी लक्ष्मीबाई उद्यान येथे एक भव्य आरोग्य सर्वरोग निदान शिबीर आयोजित करण्यात आले, त्यामध्ये सिव्हील हॉस्पिटल मधील डॉक्टर व त्यांचे सर्व स्टाफ यांनी शहरातील नागरिकांची मोफत आरोग्य तपासणी केली, तसेच छत्रपती शिवाजी महाराजांच्या 391 जयंती च्या अनुषंगाने "माझी वसुंधरा माझे अभियान" अंतर्गत शहराच्या विविध भागांमध्ये 391 वृक्षारोपण करण्याच्या मोहिमेचा शुभारंभ आज छत्रपती संभाजी महाराजांच्या पुतळ्यासमोर राणी लक्ष्मीबाई उद्यान येथे नारळाच्या झाडाचे रोपे लाऊन करण्यात आला. शिवाय शहरातील आर्थिक दृष्ट्या कमकुवत गटातील कुटुंबांमधील एका मुलीसाठी तुळजापूर नगर परिषद च्या वतीने जिजामाता कन्या सन्मान योजने अंतर्गत "सुकन्या समृद्धी योजना" अंतर्गत प्रत्येकी प्रतिमहा 100 रुपये प्रमाणे पाच वर्षासाठी एकूण 6 हजार रुपये जमा करण्यात येणार असून, अशा जवळपास शंभर लाभार्थींना याचा फायदा मिळणार आहे. अशा विविध उपक्रमांनी छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती नगरपरिषदेच्या वतीने साजरी करण्यात आली. यावेळी नगरसेवक पंडित जगदाळे, किशोर साठे, माऊली भोसले, राहुल खापले, विनोद गंगणे व सर्व कार्यालयीन अधिकारी कर्मचारी उपस्थित होते.

बातमी संकलन :-  रुपेश डोलारे , तुळजापूर , 

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा (0)
To Top