राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष युवक नळदुर्ग शहर कार्यकारणी जाहीर
तुळजापूर :- दि. 18 फेब्रुवारी (प्रतिनिधी) ज्येष्ठ नेते जीवनराव गोरे ,जिल्हाध्यक्ष सुरेश दाजी बिराजदार ,जिल्हा उपाध्यक्ष अशोक जाधव ,शिवाजीराव मोरे , शफी (भाई )शेख ,जिल्हा युवक अध्यक्ष आदित्य (भैय्या )गोरे यांच्या मार्गदर्शनाखाली राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष नळदुर्ग युवक शहराध्यक्षपदी आनंद (पिन्टू) पुदाले व कार्याध्यक्षपदी खैय्युम शेख यांची निवड झाली. तालुका अध्यक्ष धैर्यशील पाटील, विधानसभा अध्यक्ष गोकुळ (तात्या) शिंदे, मागासवर्गीय विभाग तुळजापूर शहराध्यक्ष आकाश (भाऊ )शिंदे ,नगरसेवक (नळदुर्ग)मुस्ताक (भाई )कुरेशी, सुनील बनसोडे ,बशीर (भाई )शेख नळदुर्ग शहराध्यक्ष महेबुब शेख यांनी शासकीय विश्रामगृह तुळजापूर येथे आयोजित केलेल्या बैठकीत नियुक्ती पत्र देऊन निवड करण्यात आल्या .यावेळी वसीम शेख ,बाबूलाल शेख ,वसीम कुरेशी ,गौस कुरेशी, खादर शेख मीन्ना इनामदार, ताजुद्दीन शेख, जिनोद्दीन शेख ,आनंद पवार, हाजी बेग नळदुर्ग शहरातील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
बातमी संकलन :- रूपेश डोलारे , तुळजापूर