Osmanabad : जिल्ह्यात 3 ठिकाणी चोरी : गुन्हे दाखल

0


उस्मानाबाद जिल्ह्यात 3 ठिकाणी चोरी : गुन्हे दाखल  

तामलवाडी: काटी ता. तुळजापुर  येथील महेश साळुंखे  आपले घरामसोर ठेवलेली मो.सा. क्र. एम.एच. 25 एई  7872  ही  14-15 फेब्रुवारी दरम्यानच्या रात्री अज्ञाताने चोरुन नेली. अशा मजकुराच्या महेश साळुंखे  यांनी दिलेल्या प्रथम खबरेवरुन भा.दं.सं. कलम- 379 अंतर्गत  तामलवाडी पोलीस ठाणे येथे गुन्हा नोंदवला आहे.

पोलीस ठाणे, उस्मानाबाद शहर:  बालाजी वगरे रा. तुळजापुर नाका, उस्मानाबाद यांच्या उस्मानाबाद येथील  वन  विभाग ऑफिसच्या पाठीमागे सर्व्हे नं.380 शेतातील पत्रेच्या शेडमध्ये ठेवलेले 2 एचपी/32 स्टेज बोरवेल मोटार अज्ञाताने 14 ते 15 फेब्रुवारी दरम्यानच्या रात्री  कुलुप तोडून आतील बोरवेल मोटार व केबल वायर चोरुन नेली. अशा मजकुराच्या बालाजी वगरे यांनी दिलेल्या प्रथम खबरेवरुने भा.दं.सं. कलम- 461, 380 अंतर्गत गुन्हा नोंदवला आहे.

पोलीस ठाणे, बेंबळी:  महादेव पाटील रा. बेंबळी ता.जि. उस्मानाबाद यांच्या बेंबळी येथील  राहते घरात  अज्ञाताने 15 फेब्रुवारी रोजी दुपारी घराचे कुलुप तोडून आतील 245 ग्रॅम सोन्याचे दागीने चोरुन नेले. अशा मजकुराच्या महादेव पाटील यांनी दिलेल्या प्रथम खबरेवरुने भा.दं.सं. कलम- 454, 380 अंतर्गत गुन्हा नोंदवला आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा (0)
To Top