google.com, pub-1406548548385211, DIRECT, f08c47fec0942fa0 बेवारस अवस्थेत भटकत असलेल्या 13 वर्षीय गतीमंद चिमुरडीला चाईल्ड-लाईन उस्मानाबाद च्या माध्यमातून स्व-आधारमध्ये आधार

बेवारस अवस्थेत भटकत असलेल्या 13 वर्षीय गतीमंद चिमुरडीला चाईल्ड-लाईन उस्मानाबाद च्या माध्यमातून स्व-आधारमध्ये आधार

0
बेवारस अवस्थेत भटकत असलेल्या 13 वर्षीय गतीमंद चिमुरडीला चाईल्ड-लाईन उस्मानाबाद च्या माध्यमातून स्व-आधारमध्ये आधार

उस्मानाबाद/प्रतिनिधी 
अजाणते वय.. बोलता येत नाही, लिहिणे तर दूर, ऐकूही कमी येते.. मग तिची व्यथा जाणून तरी कोण घेणार? अशीच बेवारस अवस्थेत महामार्गावर भटकंती करत असलेल्या गतिमंद चिमुरडीला चाईल्ड-लाईन उस्मानाबाद टीमच्या सतर्कतेमुळे आधार मिळाला. सध्या उस्मानाबाद तालुक्यातील आळणी येथील स्वाधार मतिमंद बालगृहात रमली आहे. वाशी तालुक्यातील सरमकुंडी फाटा येथे राष्ट्रीय महामार्गालगत साधारणतः13 वर्षाची चिमुरडी भेदरलेल्या अवस्थेत भटकत असल्याचे चाईल्ड-लाईन उस्मानाबादच्या कार्यालयात '1098'या टोल फ्री क्रमांकावर वाशी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक उस्मान शेख यांनी दि.12 मार्च रोजी कळविले. तेव्हा चाईल्ड-लाईनचे समन्वयक ज्ञानेश्वर गिरी यांनी उस्मानाबाद येथे चाईल्ड-लाईन कार्यालयात त्या मुलीला पोहचविण्याची विनंती केली. त्यानंतर वाशी पोलीस ठाण्यातील समुपदेशक पूजा सौदागर ह्या गतिमंद मुलीस उस्मानाबाद येथे घेऊन आल्या. चाईल्ड-लाईनचे संचालक डॉ.दिग्गज दापके - देशमुख  यांच्या सुचनेनुसार तिची उस्मानाबाद जिल्हा सामान्य रुग्णालयात वैद्यकीय तपासणी चाईल्ड - लाईनचे  समुपदेशक वंदना कांबळे, अमर भोसले यांच्या उपस्थितीत  करण्यात आली. तर कोविड-19 चाचणी अहवालही निर्दोष आला.19 मार्चपर्यंत ती हॉस्पिटलमध्येच चाईल्ड-लाईनच्या देखरेखीखाली होती. या काळात तिची  विचारपूस करुन सविस्तर माहिती जाणून घेण्याचा प्रयत्न केला असता ती स्वतःचे नाव सांगू शकत नाही. व ऐकूही कमी येत असल्याने तिच्या माता - पित्यांचा अथवा गावाचा ठावठिकाणा मिळू शकला नाही. चाईल्ड-लाईनच्या निकषानुसार शुक्रवारी दि.19 मार्च 2021रोजी तिला बालकल्याण समितीसमोर हजर करण्यात आले, असता बाल कल्याण समितीचे अध्यक्ष डॉ.ए.डी.कदम, सदस्य अ‍ॅड.आशा गोसावी, नंदकिशोर कोळगे, डॉ.कैलास मोटे यांनी स्वाधार मतिमंद बालगृहात तिची व्यवस्था केली. यामुळे निवासाची व्यवस्था झाल्यामुळे तिला मोठा आधार मिळाला आहे. हरवलेले, बेवारस, समस्याग्रस्त बालक आढळून आल्यास चाईल्ड-लाईन उस्मानाबाद '1098' या टोल फ्री क्रमांकावर संपर्क साधा समाजात अनेक ठिकाणी हरवलेली, बेवारस, कुटुंबापासून दुरावलेली अथवा समस्याग्रस्त बालके आढळून येतात. अशावेळी नागरिकांनी दुर्लक्ष न करता तातडीने चाईल्ड-लाईन उस्मानाबाद शी 1098' या टोल फ्री क्रमांकावर संपर्क साधून माहिती द्यावी. अशा बालकांना तातडीने मदत करुन त्यांच्या कुटुंबीयापर्यंत पोहचविण्याचे अथवा त्यांचे पुनर्वसन करण्याचे काम चाईल्ड-लाईन उस्मानाबाद मार्फत केले जाते -- डॉ.वसुधा दिग्गज दापके-देशमुख चाईल्ड-लाईन उस्मानाबाद

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा (0)
To Top