Osmanabad जिल्ह्यात 3 ठिकाणी मारहाण गुन्हे दाखल
पोलीस ठाणे, उमरगा: कदेर, ता. उमरगा येथील मनिषा बालाजी जाधव या 05 मार्च रोजी 10.30 गावातील दुध डेअरी समोरील रस्त्याने जात होत्या. यावेळी पुर्वीच्या वादाच्या कारणावरुन भाऊबंद- बालाजी, शारदाबाई व दादाराव जाधव यांसह सलगरा (मड्डी), ता. तुळजापूर येथील पोपट चव्हाण अशा चौघांनी मनिषा जाधव यांना शिवीगाळ करुन लाथाबुक्क्यांनी, बांबुने, कत्तीने मारहाण करुन ठार मारण्याची धमकी दिली. अशा मजकुराच्या मनिषा जाधव यांनी 06 मार्च रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन भा.दं.सं. कलम- 324, 323, 504, 506, 34 अंतर्गत गुन्हा नोंदवला आहे.
पोलीस ठाणे, बेंबळी: करजखेडा, ता. उस्मानाबाद येथील नितेश धोंडीराम चव्हाण हे 06 मार्च रोजी 10.00 वा. सु. गावातील तुळजापूर- औसा रस्त्यावरील पुलाखालुन मोटारसायकलने जात होते. यावेळी गावकरी- विजय, व्यंकट, पांडुरंग, सुनिता, महादेव या इंगळे कुटूंबीयांसह हरिबा, जिवन, खंडु या चव्हाण कुटूंबीयांनी नितेश चव्हाण यांची मोटारसायकल आडवून, “तु आमच्या शेतात रोटाव्हेटर का फिरवले.” असे धमकावून व शिवीगाळ करुन लाथाबुक्क्यांनी मारहाण करुन बतईने वार करुन जखमी केले. अशा मजकुराच्या नितेश चव्हाण यांनी दिलेल्या प्रथम खबरेवरुन भा.दं.सं. कलम- 341, 324, 323, 504, 506 अंतर्गत गुन्हा नोंदवला आहे.
पोलीस ठाणे, भुम: कालीदास व सत्यशीला नलवडे, रा. वडगांव (वारे), ता. भुम हे पती- पत्नी 04 मार्च रोजी 19.00 वा. सु. आपल्या शेतात असतांना “तुमचे कोकरु आमच्या ज्वारीच्या पिकात घुसले.” असा जाब भाऊबंद- धनराज व भिमराव या पिता- पुत्रांसह श्रीमती रेखा धनराज नलवडे यांनी विचारुन नमूद पती- पत्नीस शिवीगाळ करुन लाथाबुक्क्यांनी, दगडाने मारहाण करुन खुनाची धमकी दिली. अशा मजकुराच्या कालीदास नलवडे यांनी दिलेल्या प्रथम खबरेवरुन भा.दं.सं. कलम- 324, 323, 504, 506, 34 अंतर्गत गुन्हा नोंदवला आहे.