Osmanabad जिल्ह्यात जुगार , अवैध मद्य विरोधी कारवाया
“जुगार विरोधी कारवाया.”
पोलीस ठाणे, कळंब: दत्तनगर, कळंब येथील बाळु बळराम सरवदे हे 06 मार्च रोजी साठे चौक, कळंब येथे कल्याण मटका जुगार साहित्य व 1,500 ₹ रोख रक्कम बाळगले असतांना कळंब पो.ठा. च्या पथकास आढळले.
स्थानिक गुन्हे शाखा: जुगार चालू असल्याच्या गोपनीय खबरेवरुन स्था.गु.शा. च्या पथकाने 06 मार्च रोजी कळंब बसस्थान परिसरात छापा मारला यावेळी 1)जुनेद बेग 2)अजिम सत्तार, दोघे रा. कळंब 3)सुमित बारगुले, रा. पिंपळगाव, ता. कळंब हे तीघे कल्याण मटका जुगार साहित्य व 10,000 ₹ रोख रकमेसह पथकास आढळले.
यावरुन पोलीसांनी जुगार साहित्य व रक्कम जप्त करुन नमूद सर्वांविरुध्द कळंब पो.ठा. येथे महाराष्ट्र जुगार प्रतिबंध कायदा कलम- 4, 5 अंतर्गत स्वतंत्र 2 गुन्हे नोंदवले आहेत.
“अवैध मद्य विरोधी कारवाया.”
पोलीस ठाणे, मुरुम: अचलेर, ता. लोहारा येथील किसन मल्लीकार्जुन गायकवाड हे 06 मार्च रोजी आपल्या राहत्या घरासमोर 5 लि. अवैध गावठी दारु (किं.अं. 550 ₹) बाळगले असतांना मुरुम पो.ठा. च्या पथकास आढळले.
पोलीस ठाणे, वाशी: वाशी येथील ताई संजय पवार या 06 मार्च रोजी आपल्या राहत्या पत्रा शेडसमोर 34 लि. अवैध गावठी दारु (किं.अं. 2,480 ₹) बाळगल्या असतांना स्था.गु.शा. च्या पथकास आढळल्या.
यावरुन पोलीसांनी अवैध मद्य जप्त करुन नमूद आरोपींविरुध्द महाराष्ट्र मद्य निषेध कायदा अंतर्गत गुन्हे नोंदवले आहेत.