Osmanabad : जिल्ह्यात 4 ठिकाणी मारहाण : गुन्हे दाखल
पोलीस ठाणे, परंडा: माणकेश्वर, ता. भुम येथील उर्मिला दत्तात्रय सांगडे या आपले पती, सासु यांसह 01 मार्च रोजी 13.30 वा. सु. माणकेश्वर गट क्र. 438 मधील शेतातील ज्वारीचे पिक काढत होते. यावेळी ज्वारीचे पिक काढण्याच्या कारणावरुन गावातील भाऊबंद- सिमा सांगडे, सुलभा सांगडे, विद्या सांगडे, जनार्दन सांगडे, नितीन सांगडे, बळीराम सांगडे, परसु सांगडे अशा 7 जणांनी तेथे येउन उर्मिला यांसह त्यांचे पती, सासु यांना शिवीगाळ करुन लाथाबुक्क्यांनी, काठी, ज्वारीच्या चिपाडाने मारहाण करुन जखमी करुन ठार मारण्याची धमकी दिली. अशा मजकुराच्या उर्मिला सांगडे यांनी दिलेल्या प्रथम खबरेवरुन भा.दं.सं. कलम- 143, 147, 148, 149, 447, 324, 323, 504, 506 अंतर्गत गुन्हा नोंदवला आहे.
पोलीस ठाणे, उमरगा: पळसगांव, ता. उमरगा येथील प्रविण माधव काळे हे 24 फेब्रुवारी रोजी 12.30 वा. सु. आपल्या शेतात काम करत होते. यावेळी गावकरी- माधव, दिलीप, विजय सुर्यवंशी या तीघा बुंधूंसह सौदागर व युवराज सोमवंशी, महेश मुंगळे, बाळु सुरवसे अशा 7 जणांनी शेतातील रस्त्याच्या वापरावरुन प्रविण काळे यांना शिवीगाळ करुन लाथाबुक्क्यांनी, दगडाने मारहाण करुन ठार मारण्याची धमकी दिली. या मारहाणीत प्रविण यांच्या उजव्या हाताचे हाड मोडले. अशा मजकुराच्या प्रविण काळे यांनी 01 मार्च रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन भा.दं.सं. कलम- 143, 147, 148, 149, 323, 325, 336, 504, 506 अंतर्गत गुन्हा नोंदवला आहे.
पोलीस ठाणे, उस्मानाबाद (ग्रा.): हरभरा पिकाची अर्धी वाटणी करण्याच्या कारणावरुन सारोळा (बु.), ता. उस्मानाबाद येथील तृप्ती राजाभाऊ देवगीरे यांसह कुटूंबीयांचा गावकरी- रेखा गौतम मोहिरे यांसह कुटूंबीयांशी 23 फेब्रुवारी रोजी 19.00 वा. शेतात वाद होउन त्याचे पर्यावसान हाणामारीत झाले. यावेळी दोन्ही कुटूंबातील स्त्री- पुरुषांनी परस्परविरोधी गटातील स्त्री- पुरुषांना शिवीगाळ करुन लाथाबुक्क्यांनी, काठीने मारहाण करुन गंभीर जखमी केले. यावरुन दोन्ही कुटूंबीयांतील नमूद महिला सदस्यांनी दिलेल्या स्वतंत्र 2 प्रथम खबरेवरुन भा.दं.सं. कलम- 324, 323, 504, 506, 34 अंतर्गत गुन्हे नोंदवले आहेत.
पोलीस ठाणे, ढोकी: ढोकी येथील प्रविण टेकमन पटेल हे 27 फेब्रुवारी रोजी 16.30 वा. आपल्या घरासमोर बसले असतांना जुन्या वादातून गावकरी- स्वप्नील कावळे उर्फ चिट्ट्या याने प्रविण यांच्या डोक्यात उलट्या फावड्याने घाव घालून व दगडाने मारहाण करुन गंभीर जखमी केले. अशा मजकुराच्या प्रविण पटेल यांनी वैद्यकीय उपचारादरम्यान दिलेल्या लेखी निवेदनावरुन भा.दं.सं. कलम- 326, 323, 504 अंतर्गत गुन्हा नोंदवला आहे.