उस्मानाबाद तहसीलदार यांचे विज कनेक्शन कट करण्यासाठी उपकार्यकारी अभियंता यांना निवेदन

0

उस्मानाबाद तहसीलदार यांचे विज कनेक्शन कट करण्यासाठी उपकार्यकारी अभियंता यांना निवेदन

उस्मानाबाद :- जिल्ह्यात सध्या वीज वितरण कंपनीकडून थकित विज बिल ग्राहकांचे वीज कनेक्शन कट करण्याचे काम वेगाने सुरू आहे त्याच्या अनुषंगाने उस्मानाबाद तालुक्याचे तहसीलदार गणेश माळी यांच्या निवासस्थानाचे देखील बिल थकीत आहे ते कनेक्शन तातडीने कट करण्यात यावे अशी मागणी उस्मानाबाद शहरातील अभिजीत नारायण पतंगे यांनी महावितरण उप अभियंता उस्मानाबाद यांच्याकडे केली आहे.

अभिजीत नारायण पतंगे यांनी निवेदन म्हटले आहे सध्या महाराष्ट्र शासनाच्या आदेशानुसार महावितरण सक्तीची वसुली मोहीम सुरू आहे त्यानुसार गोरगरीब शेतकरी शेतमजूर कामगार यांची लाईट बिलाची थकबाकी थोडी असली तरी त्यांचे लाईट कनेक्शन तोडले जात आहे त्यानुसार समान वागणूक देऊन उस्मानाबाद चे तहसीलदार यांचे निवासस्थान ग्राहक क्रमांक 59××××××××24 असून त्यांची थकबाकी 74800 ईतकी आहे तरी त्यांचे कनेक्शन कट केलेले नाही तरी आपल्या स्थारावरुन योग्य ती कारवाई करावी .
असे निवदेनात नमुद केले आहे.


"  त्या शासकीय निवासस्थानाची रक्कम थकीत आहे . आम्ही त्यांचा पाठ पुरावा करत आहोत.
त्यातील काही रक्कम आली आहे  व उर्वरित रक्कमही दोन दिवसांत भरणार आहेत . संबंधित तहसीलदार बदलून गेले . त्यांनी बिल भरले नव्हते . आता ते भरणा करीत आहेत . -निलांबरी कुलकर्णी , उपकार्यकारी अभियंता , उस्मानाबाद ."

हि प्रतिक्रिया उस्मानाबाद येथील सकाळ वर्तमानपत्रास ( दिली आहे ) ने प्रकाशित केली आहे

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा (0)
To Top