google.com, pub-1406548548385211, DIRECT, f08c47fec0942fa0 उस्मानाबाद येथे कोरोनाचा कहर सुरूच,१९ जणांवर एकसोबत अंत्यसंस्कार!

उस्मानाबाद येथे कोरोनाचा कहर सुरूच,१९ जणांवर एकसोबत अंत्यसंस्कार!

0

उस्मानाबाद येथे कोरोनाचा कहर सुरूच,१९ जणांवर एकसोबत अंत्यसंस्कार!  

उस्मानाबाद शहरातील कपील धरा या ठिकाणी 14 एप्रिल 2021 रोजी 
  कोरोना पॉसिटीव्ह असलेल्या ७ व कोरोना संशयित म्हणून मृत्युमुखी पडलेल्या १२ आशा एकूण १९ पार्थिवांवर कपील धरा स्मशानभूमीत एकसोबत अंत्यसंस्कार नगरपरिषद कर्मचाऱ्यांनी केले. जिल्ह्यात रोज ५०० ते ६०० कोरोनाच्या नवीन रुग्णांची नोंद होत आहे. 

उस्मानाबाद येथे मागील आठवड्यातच एक सोबत १३ रूग्णांना अग्नी देण्यात आला होता. तसेच आता पर्यंत ५५० पेक्षा जास्त कोरोना रुग्णांचे नगरपरिषद कर्मचाऱ्यांनी अंत्यसंस्कार केले आहे.

मागील काही दिवसांपासून राज्यभरात कोरोनाच्या दुसऱ्या लाटेने थैमान घातले आहे. महाराष्ट्र राज्यच्या अनेक जिल्ह्यांमध्ये भयावह परिस्थिती निर्माण झाल्याचे चित्र दिसून येत आहे. अहमदनगर, नांदेड, बीड या जिल्ह्या पाठोपाठ आता उस्मानाबाद जिल्ह्यात देखील कोरोनामुळे होणाऱ्या मृत्यूचे तांडव पहावयास मिळत आहे. जिल्ह्यातील शासकीय आरोग्य यंत्रणेच्या क्षमतेपेक्षा जास्त प्रमाणे रुग्ण सापडत असल्याने आरोग्य यंत्रणेवर मोठ्या प्रमाणात याचा ताण पडत असल्याचे दिसून येत आहे. 

उस्मानाबाद जिल्ह्यातील रुग्ण वाढत आहेत व जिल्ह्यातून क्रिटिकल कंडिशन असणारे रुग्ण उस्मानाबाद जिल्हा शासकीय रुग्णालय येथे पाठवले जातात त्यामुळे याठीकाणी या तुन उपचारादरम्यान मृत्यू झालेल्या रुग्णांना उस्मानाबाद शहरातील कपिलधारा येथे अंत्यसंस्कार करण्यात येते त्यामुळे हा उस्मानाबाद शहरातील कपिलधारा या ठिकाणी अंत्यसंस्कार करण्यात येणारा आकडा अजून मोठा दिसून येत आहे. 

नगरपरिषद कडून नेमण्यात आलेल्या पथकात पथक प्रमुख एस बी कांबळे, सह पथक प्रमुख व्ही एस गोरे, वाहन चालक दिगंबर बाबुराव डुकरे, मदतनीस अजिंक्य राहुल जानराव, बालाजी तुकाराम चौगुले, चंद्रकांत सतीश धावणे, आकाश अण्णा शिंगाडे, स्वराज राहुल जानराव,शेख जलील हैदर यांचा समावेश आहे.
सर्व रीती-रिवाज पद्धतीने या मृतदेहांवर अंत्यसंस्कार केले आहे

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा (0)
To Top