google.com, pub-1406548548385211, DIRECT, f08c47fec0942fa0 Osmanabad : कोरोना विषाणूच्या संसर्गची साखळी तोडण्यासाठी 1 मे पर्यंत प्रतिबंधात्मक उपाययोजना लागू - जिल्हाधिकारी कौस्तुभ दिवेगावकर

Osmanabad : कोरोना विषाणूच्या संसर्गची साखळी तोडण्यासाठी 1 मे पर्यंत प्रतिबंधात्मक उपाययोजना लागू - जिल्हाधिकारी कौस्तुभ दिवेगावकर

0

 Osmanabad : कोरोना विषाणूच्या संसर्गची साखळी तोडण्यासाठी 1 मे पर्यंत प्रतिबंधात्मक उपाययोजना लागू  - जिल्हाधिकारी कौस्तुभ दिवेगावकर

Osmanabad  दि .24 ( प्रतिनिधी ): राज्यासह जिल्ह्यात दिवसेंदिवस वाढत असलेल्या कोरोना रुग्णांची संख्येच्या अनुषंगाने 14 एप्रिल 2021 च्या रात्री 8 वाजेपासून ते 1 मे 2021 पर्यंतच्या सकाळी 7 वाजेपर्यंत  या विषाणूच्या संसर्गाची साखळी तोडण्यासाठी करावयाच्या   कार्यवाहीबाबत सविस्तर मार्गदर्शक सूचना राज्य शासनाने  दिल्या आहेत. त्याअंतर्गत जिल्ह्यात 144 कलाम लागू केले आहे .त्यामुळे या कालावधीत जिल्ह्यात कोरोना प्रतिबंधात्मक उपाययोजनाही लागू करण्यात आल्या आहेत .याबाबतचे आदेश जिल्हाधिकारी तथा जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाचे अध्यक्ष कौस्तुभ दिवेगावकर यांनी आज जारी केले आहेत .
जिल्ह्यात फौजदारी प्रक्रिया संहिता 1973 तेतील कलम 144 मधील तरतुदींनुसार जिल्हाधिकारी यांना प्राप्त अधिकरानुसार जिल्ह्यातील करोना विषाणुचा प्रादुर्भाव रोखण्याकरिता प्रतिबंधात्मक उपाययोजनेचा एक भाग म्हणून महाराष्ट्र शासनाच्या 13 एप्रिल 2021 च्या आदेशान्वये दिलेल्या मार्गदर्शक सूचना विचारात घेऊन संपूर्ण उस्मानाबाद जिल्ह्यात दि. 14 एप्रिल 2021 रोजी रात्री 8 वाजेपासून दि. 1 मे 2021 रोजी सकाळी 7  वाजेपर्यंतच्या कालावधीत पुढीलप्रमाणे  कार्यवाही करण्याबाबत आदेश देण्यात आले  आहेत.
*रात्रीची संचारबंदी जरी :-
या आदेशान्वये संपूर्ण उस्मानाबाद जिल्ह्यात फौजदारी प्रक्रिया संहिता 1973 चे कलम 144 लागू करण्यात येत आहे. पुढे
नमूद केलेल्या वैध कारणांशिवाय कोणत्याही व्यक्तीला सार्वजनिक ठिकाणी संचार करण्यास मनाई राहील. 
यामध्ये स्पष्टपणे नमूद केलेल्या सर्व आस्थापना, सार्वजनिक ठिकाणे, बाबी - उपक्रम, सेवा पूर्णपणे बंद राहतील.
* अत्यावश्यक सेवांमध्ये (Essential Category) :  समावेश केलेल्या पुढे  नमूद केलेल्या सेवा आणि  उपक्रमांना संचारबंदीतून वगळण्यात येत आहे .  त्यांची नेहमीची प्रक्रिया व आणि  त्यासाठीची आवश्यक हालचाल कोणत्याही निर्बंधांशिवाय चालू राहील. 
 सूट देण्यात आलेल्या (Exceptions Category) पुढे नमूद सेवा आलेल्या उपक्रमांना सकाळी 7 ते रात्री 8 या वेळेमध्ये चालू ठेवण्याची परवानगी राहील .  या वेळेमध्ये त्यांची नेहमीची प्रक्रिया  आणि त्यासाठीची आवश्यक हालचाल कोणत्याही निर्बंधांशिवाय चालू राहील. 
घरगुती मदतनीस , वाहनचालक , कामावरची हजेरी यांचा स्थानिक परिस्थितीचा विचार करुन सूट देण्यात आलेल्या बाबींमध्ये समावेश करण्याबाबत निर्णय घेण्याचा अधिकार संबंधित तालुक्याचे Incident Commander तथा तहसीलदार यांना राहील. 
* अत्यावश्यक सेवांमध्ये (Essential Category) पुढील गोष्टींचा समावेश असेल :
दवाखाने, रोगनिदान केंद्रे, चिकित्सालये, लसीकरण केंद्रे, वैद्यकीय विमा कार्यालये, औषधालये, औषध कंपन्या, चष्मा दुकाने, इतर वैद्यकीय व आरोग्य सेवा आणि त्यांची उत्पादन व वितरणासाठी सहाय्यक सर्व घटक जसे कार्यालये, वाहतूक, पुरवठा साखळी. लसींचे उत्पादन व वितरण, सॅनिटायझर्स, मास्क्स, वैद्यकीय साधनसामुग्री, त्यांची उपकरणे, कच्च्या मालाचे व सहाय्यक सुविधांचे घटक. 
पशुवैद्यकीय सेवा, प्राणी संगोपन केंद्रे व पाळीव प्राण्यांच्या खाद्याची दुकाने. 
किराणा साहित्याची दुकाने, भाजीपाला, फळविक्रेते, दुध संकलन व वितरण केंद्र, बेकरी, मिठाई. 
शितगृहे  आणि वखार सेवा.
*सार्वजनिक वाहतूक : विमाने, रेल्वे, टॅक्सी, ॲटोरिक्षा आणि  सार्वजनिक बसेस.
विविध देशांच्या राजदूतांच्या कार्यालयांशी संबंधित सेवा.
स्थानिक विभागांची,  प्राधिकरणांची सर्व मान्सूनपूर्व करण्यात येणारी कामे.
स्थानिक विभागांच्या, प्राधिकरणांच्या सर्व सार्वजनिक सेवा. 
रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया व रिझर्व्ह बँकेकडून अत्यावश्यक म्हणून निदेर्शित करण्यात आलेल्या सेवा.
सेबी (SEBI) ने मान्यता दिलेल्या बाजारांशी संबंधित सर्व कार्यालयांतील मुलभूत सुविधा संस्था जसे स्टॉक एक्सचेंजेस, डिपॉझिटरीज, क्लिअरिंग कार्पोरेशन्स आदी आणि सेबी (SEBI) कडे नोंदणीकृत इतर मध्यस्थ. 
दूरसंचार सेवां (Telecom Services) च्या दुरुस्ती , देखभालीसाठी आवश्यक असणा-या बाबी तसेच सेवा.
मालवाहतूक
पाणीपुरवठा सेवा
कृषीविषयक उपक्रम आणि कृषी विषयक कामे सुरळितपणे सुरु राहण्यासाठी आवश्यक असलेल्या संबंधित बाबी जसे कृषी अवजारे, बियाणे, खते, उपकरणे आणि त्यांची दुरुस्ती.
आयात-निर्यातविषयक सर्व सुविधा.
ई-वाणिज्य (E-Commerce) सेवा (फक्त अत्यावश्यक वस्तू व सेवांच्या पुरवठ्यास परवानगी राहील.)
*मान्यताप्राप्त प्रसारमाध्यमे
पेट्रोल पंप व पेट्रोलियम संबंधित उत्पादने (offshore  ,  onshore production) यांसह
सर्व मालवाहतूक सेवा
Data Centers/Cloud Service Providers/ IT services supporting critical infrastructure and services. 
शासकीय व खाजगी सुरक्षा सेवा (Security Services). 
विद्युत व गॅस सिलेंडर पुरवठा सेवा. 
ATM’S
पोस्टाच्या (डाक विभागाच्या) सेवा
बंदरे व संबंधित सेवा
लस (Vaccines)/जीवनावश्यक औषधे (lifesaving drugs)/औषधी उत्पादने (Pharmaceutical products) यांच्याशी संबंधित असणारे परवानाधारक वाहतूकदार (Licensed Multi Modal Transport Operators) व कस्टम हाऊस एजंट्स
कोणत्याही अत्यावश्यक सेवांच्या उत्पादनासाठीचा कच्चा माल , आवेष्टन साहित्याचे (packaging material) उद्योग
आगामी पावसाळा ऋतुचे अनुषंगाने व्यक्ती व संस्थांकरिता आवश्यक असलेल्या वस्तूंचे उत्पादन करणारे उद्योग
स्थानिक आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाने अत्यावश्यक म्हणून निर्देशित केलेल्या सेवा

*अंमलबजावणी करणा-या यंत्रणांनी या सेवांबाबत पुढील  सर्वसाधारण तत्त्वांचे, सूचनांचे पालन करावे : 
      1. सर्व अंमलबजावणी करणा-या यंत्रणांनी मूलभूतपणे कठोर निर्बंध लोकांच्या हालचालीशी संबंधित आहेत . वस्तू व मालाला ते लागू होणार नाहीत.
      2. या मुद्द्यामध्ये नमूद करण्यात आलेल्या सेवांकरिता होणा-या हालचालींचा समावेश मुद्दा क्र. 1 (b) 
         मध्ये नमूद वैध कारणांमध्ये असेल. 
      3. या सेवांकरिता संबंधित व्यक्ती व संस्थांना अत्यावश्यक असलेल्या प्रासंगिक, अनुषंगिक बाबींना अत्यावश्यक बाबींमध्ये गृहित धरले जाईल. याठिकाणी ‘essential for essential is essential’ हे तत्त्व लागू राहील.

या आदेशामध्ये अत्यावश्यक सेवांमध्ये समावेश केलेल्या बाबींची दुकाने (shops) यांनी पुढील मार्गदर्शक सूचनांचे पालन करावे :
अत्यावश्यक बाबींच्या दुकानदारांनी, तेथे काम करणा-या व्यक्तींनी व दुकानाच्या आवारामधील ग्राहकांनी कोविड-19 च्या सर्व प्रतिबंधात्मक उपाययोजनांचे काटेकोरपणे पालन करावे.
अत्यावश्यक वस्तूंच्या दुकानदारांनी व त्याठिकाणी काम करणा-या व्यक्तींनी भारत सरकारने निश्चित केलेल्या नियमांनुसार तात्काळ लसीकरण (Vaccination) करुन घ्यावे. तसेच खबरदारीच्या उपाययोजना जसे पारदर्शक काचेच्या किंवा इतर भौतिक आच्छादनांच्या आडून ग्राहकांशी संवाद साधणे, इलेक्ट्रॉनिक पेमेंट इ. चा अवलंब करावा. 
कोणत्याही अत्यावश्यक बाबींच्या दुकान मालकाने, तेथे काम करणा-या व्यक्तीने किंवा तेथे आलेल्या ग्राहकाने कोविड-19 च्या प्रतिबंधात्मक उपाययोजनांचे उल्लंघन केल्याचे निदर्शनास आल्यास त्यास  500 रुपये  इतका दंड आकारण्यात येईल. आणि जर कोविड-19 च्या प्रतिबंधात्मक उपाययोजनांचे उल्लंघन करणा-या ग्राहकास सेवा देत असल्याचे दिसून आल्यास दुकानदारास 1000  रुपये  इतका दंड आकारण्यात येईल. अशा प्रकारचे वारंवार उल्लंघन आढळून आल्यास कोविड-19 हा साथरोग म्हणून अधिसूचित असेपर्यंतच्या कालावधीसाठी दुकान बंद करण्याचा आदेश दुकानदारास दिला जाईल.
अत्यावश्यक बाबींच्या दुकानांमध्ये काम करण्यासाठी , सेवा देण्यासाठी व्यक्तींच्या होणा-या हालचालीचा समावेश मुद्दा क्र. 1 (b) मध्ये नमूद वैध कारणांमध्ये असेल.
स्थानिक यंत्रणा (Incident Commander/पोलीस/न.प./न.पा./न.पं./ग्रा.पं.) यांनी मुदा्दा क्र. 2(3) मध्ये नमूद करण्यात आलेली किराणा साहित्याची दुकाने, भाजीपाला, फळविक्रेते, दुध संकलन व वितरण केंद्र, बेकरी, मिठाई, सर्व प्रकारची खाद्यपदार्थांची दुकाने इ. ज्या भागात जास्त घनतेने (कमी अंतराने) आहेत त्याठिकाणी व लोकांची मोठ्या प्रमाणात गर्दी होईल अशा भागात त्या दुकानांच्या जागा बदलणेबाबत (staggering in terms of location) आणि आवश्यकता असल्यास तेथील दुकानांच्या वेळांमध्ये बदल करण्याबाबत आवश्यक कार्यवाही करावी. जर अस्थायी स्वरुपाची (non-permanent structures) दुकाने असल्यास त्यांना मोकळ्या जागेमध्ये (Open Spaces) हलविण्यासाठी मोकळ्या जागा निश्चित करण्यात याव्यात. अत्यावश्यक बाबी या कोविड-19 च्या प्रादुर्भावाचे केंद्र होऊ नये यासाठी आवश्यक त्या सर्व उपाययोजना करण्याची दक्षता स्थानिक यंत्रणांनी (Incident Commander/पोलीस/न.प./न.पा./न.पं./ग्रा.पं.) घ्यावी. आवश्यकता असल्यास स्थानिक यंत्रणा (Incident Commander/पोलीस/न.प./न.पा./न.पं./ग्रा.पं.) एखाद्या भागातील या बाबी बंद ठेवू शकतील.  
या आदेशान्वये बंद ठेवण्यात आलेल्या सर्व दुकानांच्या मालकांनी व त्याठिकाणी काम करणा-या सर्व व्यक्तींनी भारत सरकारने निश्चित केलेल्या नियमांनुसार तात्काळ लसीकरण (Vaccination) करुन घ्यावे. तसेच खबरदारीच्या उपाययोजना जसे पारदर्शक काचेच्या किंवा इतर भौतिक आच्छादनांच्या आडून ग्राहकांशी संवाद साधणे, इलेक्ट्रॉनिक पेमेंट इ. ची व्यवस्था करणेबाबत आवश्यक ती पूर्वतयारी करावी. 
* सार्वजनिक वाहतूक व्यवस्था (Public Transport) :
सार्वजनिक वाहतूक व्यवस्था पुढे नमूद निर्बंधांसह चालू राहील. 
ॲटोरिक्षा (Auto Rickshaw)
चालक व 2 प्रवासी फक्त (Driver + 2 Passengers only)

टॅक्सी- चारचाकी 
(Taxi – 4 Wheelers) 
चालक व परिवहन नियमांनुसार अनुज्ञेय क्षमतेच्या 50 टक्के वाहन क्षमता (Driver + 50 टक्के  vehicle capacity as per RTO)

बस (Bus)
परिवहन विभागाच्या मान्यतेनुसार (RTO Passing) पूर्ण आसन क्षमतेने (Full seating occupancy) प्रवासी वाहतूकीस परवानगी राहील. परंतु प्रवाशांना उभे राहून प्रवास करण्यास (Standing Passengers) मनाई राहील. 

सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेचा वापर करणा-या सर्व व्यक्तींनी योग्य पद्धतीने मास्क घालणे बंधनकारक राहील. याचे उल्लंघन करणा-या व्यक्तीस  500 रुपये इतका दंड आकारण्यात येईल. 
चारचाकी टॅक्सीमध्ये मध्ये जर कोणत्याही व्यक्तीने मास्क घातलेला नसेल तर उल्लंघन करणारा व्यक्ती व टॅक्सी चालक यांना प्रत्येकी  500 रुपये इतका दंड आकारण्यात येईल. 
प्रत्येक फेरी (Trip) नंतर सर्व वाहनांचे निर्जंतूकीकरण (Sanitization) करण्यात यावे. 
सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेमध्ये चालक व इतर कर्मचारी जे लोकांच्या संपर्कात येतात त्यांनी लवकरात लवकर भारत सरकारने निश्चित केलेल्या नियमांनुसार तात्काळ लसीकरण (Vaccination) करुन घ्यावे आणि कोविड-19 च्या प्रतिबंधात्मक उपाययोजनांचे काटेकोरपणे पालन करावे. टॅक्सी व ॲटोरिक्षांच्या चालकांनी स्वत:चे पूर्णपणे पारदर्शक प्लास्टीक शीटच्या , इतर पारदर्शक वस्तूच्या आवरणाने विलगीकरण (isolation) करणेबाबत त्यांना प्रोत्साहित करण्यात यावे. 
सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेमध्ये काम करण्यासाठी , सेवा देण्यासाठी व्यक्तींच्या होणा-या हालचालीचा समावेश मुद्दा क्र. 1 (b) मध्ये नमूद वैध कारणांमध्ये असेल.
परगावी जाणा-या रेल्वेंच्या बाबतीत रेल्वे व्यवस्थापनाने रेल्वेच्या सर्वसामान्य कक्षामध्ये (General Compartment) प्रवासी उभे राहून प्रवास करणार नाहीत व सर्व प्रवाशी मास्क वापरतील याची दक्षता घ्यावी. 
सर्व रेल्वेंमध्ये मास्क न वापरणा-या कोणत्याही व्यक्तींस  500 रुपये  इतका दंड आकारण्यात यावा.
सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेस अटी व शर्तींवर देण्यात आलेल्या परवानगीमध्ये ती सेवा सुरळितपणे सुरु राहण्यासाठी आवश्यक असलेल्या प्रासंगिक , अनुषंगिक सेवांचाही समावेश असेल. यामध्ये विमानतळावर आवश्यक असलेली मालमत्तेची हाताळणी, तिकिटींग  आदी  प्रासंगिक , अनुषंगिक बाबींचाही समावेश आहे. 
रेल्वे,  बस , विमाने यांमध्ये प्रवास करणा-या प्रवाशांना त्यांच्या घरापासून रेल्वेस्थानक , बस स्थानक ,  विमानतळ याठिकाणी किंवा तेथून त्यांचे घराकडे जाण्यासाठी त्यांचेकडे असणा-या वैध टिकिटाचे आधारावर संचार , प्रवास करण्याची परवानगी राहील.
कर्नाटक राज्यातून उस्मानाबाद जिल्ह्यामध्ये येणा-या व्यक्तींनी कोविड-19 नसलेबाबतचे निगेटिव्ह आरटीपीसीआर , अँटीजेन चाचणीचे प्रमाणपत्र सोबत बाळगणे बंधनकारक राहील.   
 
*सूट देण्यात आलेल्या बाबी (Exemption Category) , 
कार्यालये (Offices) : 
पुढे  नमूद कार्यालयांचा सूट देण्यात आलेल्या बाबींमध्ये समावेश होईल. 
केंद्र सरकार, राज्य शासन आणि  स्थानिक शासकीय विभागांची कार्यालये  तसेच त्यांची वैधानिक मंडळे व संस्था.
सहकारी, खाजगी व PSU बँका, पतसंस्था.
अत्यावश्यक सेवा देणा-या कंपन्यांची कार्यालये.
विमा , वैद्यकीय विमा कंपन्या (Insurance/Mediclaim Companies)
औषधनिर्मिती कंपन्यांची उत्पादन व वितरण सेवांकरिता गरजेची असलेली कार्यालये
RBI द्वारे नियंत्रित केल्या जाणा-या संस्था व मध्यस्थी करणा-या संस्था (intermediaries including standalone primary dealers, CCIL, NPCI, payment system operators) आणि RBI द्वारे नियंत्रित केल्या जाणा-या बाजारांमध्ये काम करणारे सर्व आर्थिक बाजारातील भागीदार.
सर्व बँकींग सेवा न देणा-या वित्तीय संस्था (All Non-Banking Financial Corporations)
सर्व सूक्ष्म वित्तीय संस्था (All Micro Finance Institutions)
जर न्यायालय (Courts), न्यायाधिकरण (Tribunals) किंवा चौकशी पथकांचे (Commissions of Enquiries) कामकाज चालू असल्यास विधीज्ञांची कार्यालये (Offices of Advocates)
कोविड-19 च्या प्रतिबंधात्मक उपाययोजनांच्या अंमलबजावणीचे कामकाज करणारी कार्यालये वगळता उक्त नमूद सर्व कार्यालये कमीत कमी क्षमतेने व कोणत्याही परिस्थितीत 50 टक्के  पेक्षा जास्त नसलेल्या क्षमतेने चालू राहतील. 
उक्त नमूद कार्यालयांमध्ये काम करण्यासाठी कर्मचा-यांकडून होणा-या हालचालीचा समावेश मुद्दा क्र. 1 (b) मध्ये नमूद वैध कारणांमध्ये असेल.
सर्व कार्यालयांमध्ये भेट देण्याची अभ्यागतांना परवानगी असणार नाही. सर्व शासकीय कार्यालये कार्यालयाचे आवारामध्ये उपस्थित असलेले कार्यालयातील अधिकारी , कर्मचारी यांच्या व्यतिरिक्त इतर कोणत्याही व्यक्तींसोबत घ्यावयाच्या बैठका ऑनलाईन पद्धतीने घेण्यात याव्यात.
सर्व खाजगी  आणि शासकीय कार्यालयांमधील व्यक्तींनी भारत सरकारने निश्चित केलेल्या नियमांनुसार तात्काळ लसीकरण (Vaccination) करुन घ्यावे. 
*खाजगी वाहतूकव्यवस्था (Private Transport ):
खाजगी बसेस सह खाजगी वाहनांना फक्त अत्यावश्यक, अतितातडीच्या सेवांकरिता किंवा या आदेशामध्ये दिलेल्या वैध कारणांकरिता वाहतू करण्याची परवानगी राहील.
याबाबत कोणतेही उल्लंघन केल्यास  1000 रुपये इतका दंड आकारण्यात येईल. 
खाजगी बसेसकरिता पुढील बाबींचे पालन करणे आवश्यक राहील.
आसन क्षमते इतक्याच प्रवाशांची वाहतूक करणे. प्रवाशांना उभे राहून प्रवास करण्याची मनाई राहील.
खाजगी बसेसमधील सर्व कर्मचा-यांनी भारत सरकारने निश्चित केलेल्या नियमांनुसार तात्काळ लसीकरण (Vaccination) करुन घ्यावे, आणि कोविड-19 च्या प्रतिबंधात्मक उपाययोजनांचे काटेकोरपणे पालन करावे. 
*रेस्टॉरंट्स, बार, हॉटेल :
निवासी सेवा असलेल्या हॉटेलच्या आवारामध्ये असलेले व हॉटेलमधील एक भाग असलेले रेस्टॉरंट्स व बार वगळता उर्वरित सर्व रेस्टॉरंट्स व बार मध्ये खाण्या-पिण्याच्या सेवा बंद राहतील. 
फक्त घरपोच सेवा (Home delivery) देण्यास परवानगी राहील व कोणालाही ऑर्डर देण्यासाठी किंवा घेऊन जाण्यासाठी (pickup) रेस्टॉरंट व बार मध्ये जाण्याची परवानगी असणार नाही. 
निवासी सेवा असलेल्या हॉटेल्समध्ये असलेले रेस्टॉरंट्स व बार हॉटेलमध्ये निवासाकरिता असलेल्या अतिथिंकरिताच चालू ठेवता येतील. कोणत्याही परिस्थितीत बाहेरील अतिथींना परवानगी असणार नाही. हॉटेलमध्ये निवासाकरिता नसलेल्या व्यक्तींकरिता वरिलप्रमाणे मुद्दा क्र. c) b. प्रमाणे कार्यवाही करावी. हॉटेलमध्ये निवासकरिता असलेल्या अतिथींना केवळ या आदेशामध्ये नमूद करण्यात आलेल्या वैध कारणांसाठी अथवा अत्यावश्यक सेवांकरिता अथवा सूट देण्यात आलेल्या बाबींमधील कार्यालयीन बाबींकरिता बाहेर पडण्यास परवानगी राहील. 
घरपोच सेवे (Home delivery) च्या प्रक्रियेमध्ये समाविष्ट असलेल्या सर्व व्यक्तींनी भारत सरकारने निश्चित केलेल्या नियमांनुसार तात्काळ लसीकरण (Vaccination) करुन घ्यावे.
एकापेक्षा जास्त कुटुंबे निवास करत असलेल्या इमारतीच्या प्रवेशद्वावरच घरपोच सेवा (Home delivery) देण्यात येईल व तेथून पुढील अंतर्गत ने-आण संबंधित इमारतीकरिता नियुक्त कर्मचा-यांकडून करण्यात येईल. याठिकाणी घरपोच सेवा (Home delivery) देणा-या व्यक्ती व इमारतीकरिता नियुक्त कर्मचारी यांनी कोविड-19 च्या प्रतिबंधात्मक उपाययोजनांचे काटेकोरपणे पालन करणे बंधनकारक आहे. 
कोविड-19 च्या प्रतिबंधात्मक उपाययोजनांचे कोणत्याही प्रकारे उल्लंघन केल्याचे दिसून आल्यास उल्लंघन करणा-या व्यक्तीस  1000 रुपये  आणि संबंधित आस्थापनेस  10 हजार रुपये  इतका दंड आकारण्यात येईल. अशा प्रकारचे वारंवार उल्लंघन आढळून आल्यास कोविड-19 जोपर्यंत साथरोग म्हणून अधिसूचित राहील तोपर्यंत संबंधित आस्थापना चालू ठेवण्याची परवानगी (Licenses or permissions) रद्द करण्यात येईल. 
रेस्टॉरंट व बार या आस्थापनांमध्ये काम करणारे सर्व कर्मचारी यांनी भारत सरकारने निश्चित केलेल्या नियमांनुसार तात्काळ लसीकरण (Vaccination) करुन घ्यावे.
*उत्पादन क्षेत्र (Manufacturing Sector) : 
पुढे नमूद उद्योग आवश्यकतेनुसार विविध शिफ्टसमध्ये चालू राहतील.
जे उद्योग या आदेशात नमूद अत्यावश्यक सेवांकरिता आवश्यक असलेल्या वस्तू तयार करतात ते पूर्ण क्षमतेने कार्यरत राहतील. 
निर्यातीकरिता बंधनकारक असलेल्या बाबींची पूर्तता करणारे निर्यातविषयक उद्योग. 
ज्या उद्योगांची प्रक्रिया तात्काळ बंद करणे व पुन्हा चालू करता येणे शक्य नाही अशा प्रकारातील उद्योग जास्तीत जास्त 50 टक्के  क्षमतेने चालू ठेवावेत. या तरतुदीचा गैरवापर होणार नाही व आवश्यक ती खबरदारी घेण्यात येईल याची दक्षता उपअभियंता, महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळ, उस्मानाबाद यांनी घ्यावी. या प्रक्रियेमध्ये अत्यावश्यक बाबींकरिता आवश्यक असलेल्या वस्तू तयार करणा-या उद्योगांशिवाय इतर उद्योगांना ऑक्सीजनचा वापर करता येणार नाही. या उद्योगांनी शक्यतो त्यांचे आवारामध्येच कामगारांच्या निवासाची सोय करावी किंवा त्यांच्या निवासाची सोय आवाराचे बाहेर असल्यास जेथवर शक्य आहे तोपर्यंत त्यांची हालचाल ही isolation bubble मध्ये करण्याची कार्यवाही करावी.   
ज्या उद्योगांनी त्यांचे कामगारांना एकाच आवारामध्ये (Campus) किंवा एकाच विलगीकरण सुविधेमध्ये काम करण्याची सोय करुन दिली आहे जेथून isolated bubble मध्ये हालचाल होईल तेथे फक्त 10 टक्के  व्यवस्थापकीय वर्गास बाहेरून येणाची परवानगी राहील. या आदेशाचे कालावधीपर्यंत कर्मचा-यांना आवाराचे बाहेर जाण्यास परवानगी असणार नाही. या उद्योगांनी आवश्यकतेनुसार वेगवेगळ्या शिफ्ट्समध्ये काम करावे. 
उत्पादन क्षेत्रातील व्यवस्थापकीय वर्ग व सर्व कर्मचा-यांनी भारत सरकारने निश्चित केलेल्या नियमांनुसार तात्काळ लसीकरण (Vaccination) करुन घ्यावे. (यामध्ये कोणालाही सूट असणार नाही)
या नियमांनुसार सुरु ठेवण्यात येणारे कारखाने व उद्योग यांनी खालील शिस्तीचे पालन करणे बंधनकारक आहे. 
कामगारांना प्रवेश देण्यापूर्वी त्यांचे शरीराचे तापमान थर्मल स्कॅनरद्वारे तपासावे आणि ते सर्व कोविड-19 च्या प्रतिबंधात्मक उपाययोजनांचे पालन करत असल्याची दक्षता घ्यावी. 
जर एखादा कामगार पॉझिटिव्ह आढळला तर त्या कामगाराचे संपर्कात आलेल्या इतर कामगारांना त्यांचे स्वखर्चावर विलगीकरण (Quarantine) करण्यात यावे. 
कारखाने/उत्पादन क्षेत्र ज्याठिकाणी 500 पेक्षा जास्त कामगार काम करतात त्यांनी स्वत:चे विलगीकरण केंद्र (Quarantine facilities) स्थापन करावे. या विलगीकरण केंद्रामध्ये सर्व सोईसुविधा असणे आवश्यक आहे व जर उद्योगाच्या आवाराबाहेर अशा प्रकारचे विलगीकरण केंद्र स्थापन केले असेल तर संसर्ग झालेल्या व्यक्तीस त्याठिकाणी हलविताना तो कोणत्याही इतर व्यक्तींच्या संपर्कात येणार नाही याची दक्षता घ्यावी.
एखादा कामगार पॉझिटिव्ह आढळल्यास पूर्ण जागेचे निर्जंतूकीकरण होईपर्यंत युनिट बंद करण्यात यावे.
गर्दी टाळण्यासाठी जेवण व चहाच्या वेळांचे योग्य व्यवस्थापन करावे. एकत्रित येऊन जेवण करण्यास परवानगी देऊ नये.
सार्वजनिक प्रसाधनगृहांचे वारंवार निर्जंतूकीकरण करण्यात यावे.
एखादा कर्मचारी पॉझिटिव्ह आढळल्यास त्याला वैद्यकीय रजा मंजूर करण्यात यावी व या कारणामुळे त्याच्या अनुपस्थितीकरिता त्याला सेवेतून काढू नये. जर तो कर्मचारी कोरोना पॉझिटिव्ह आला नसता तर त्याने जे लाभ प्राप्त केले असते ते सर्व लाभ त्याला देण्यात यावेत. 
या आदेशामध्ये स्पष्टपणे परवानगी देण्यात आलेले कारखाने/उद्योग वगळता इतर सर्व कारखाने/उद्योग यांनी या आदेशाच्या कालावधीपर्यंत त्यांचे कामकाज बंद ठेवावे. याबाबत कोणतीही शंका असल्यास उपअभियंता, महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळ, उस्मानाबाद हे निर्णय घेतील. 
* रस्त्याच्या कडेला खाद्यपदार्थांची विक्री करणारे विक्रेते:
रस्त्याच्या कडेला खाद्यपदार्थांची, चहा, ज्युस इ. पेयांची विक्री करणा-या विक्रेत्यांना विक्रीच्या ठिकाणी व्यक्तींना खाद्यपदार्थ , पेये खाण्यासाठी/पिण्यासाठी देण्यास परवानगी असणार नाही. सकाळी 7 ते रात्री 8 या वेळेमध्ये केवळ घरपोच सेवा देता येईल. या कारणासाठी होणा-या हालचालीचा समावेश मुद्दा क्र. 1 (b) मध्ये नमूद वैध कारणांमध्ये असेल. 
प्रतिक्षेमध्ये असलेल्या ग्राहकांनी काउंटर पासून पुरेसे सामाजिक अंतर ठेवून थांबावे.
या विक्रेत्यांनी व संबंधित सर्व व्यक्तींनी भारत सरकारने निश्चित केलेल्या नियमांनुसार तात्काळ लसीकरण (Vaccination) करुन घ्यावे. 
स्थानिक प्राधिकरण (इन्सीडेंट कमांडर, न.प./न.पा./न.पं./ग्रा.पं.) याठिकाणी लक्ष ठेवण्यासाठी पुरेसे व्यक्तींची नियुक्ती करावी/CCTV बसवावेत. कोणतेही विक्रेते किंवा ग्राहक बेशिस्तपणे वर्तन करीत कोविड-19 च्या नियमांचे उल्लंघन करीत असल्याचे दिसून आल्यास त्यांना 500 रुपये इतका दंड आकारण्यात यावा. कोणताही विक्रेता अशा प्रकारचे उल्लंघन करीत असलेल्या कोणत्याही ग्राहकास सेवा देत असल्याचे दिसून आल्यास त्या विक्रेत्यास  500 रुपये इतका दंड आकारण्यात यावा. 
*वर्तमानपत्रे (Newspapers):-
वर्तमानपत्रे , मासिके , नियतकालिके यांची छपाई आणि  वितरण करता येईल.
सकाळी 7 ते रात्री 8 या वेळेमध्ये घरपोच सेवा देण्यास परवानगी राहील.
याठिकाणी काम करणारे सर्व व्यक्तींनी भारत सरकारने निश्चित केलेल्या नियमांनुसार तात्काळ लसीकरण (Vaccination) करुन घ्यावे. 

करमणूक (Recreation), *मनोरंजन (Entertainment), दुकाने (shops), मॉल्स (malls), शॉपिंग सेंटर्स (Shopping Centres) आदी : 
कलम  एक  मधील कोणत्याही तरतूदीस बाधा येऊ नये  म्हणून
चित्रपटगृहे, सिनेमा हॉल्स बंद राहतील.
नाट्यगृहे व सभागृहे बंद राहतील.
मनोरंजन केंद्रे (Amusement Parks)/Arcades/व्हिडीओ गेम सेंटर्स बंद राहतील.
वॉटर पार्क्स (Water Parks) बंद राहतील.
क्लब्स, जलतरण तलाव, व्यायामशाळा (Gyms) व स्पोर्ट कॉम्प्लेक्स बंद राहतील.
या नमूद आस्थापनांशी संबंधित सर्व व्यक्तींनी भारत सरकारने निश्चित केलेल्या नियमांनुसार तात्काळ लसीकरण (Vaccination) करुन घ्यावे. 
चित्रपट/मालिका/जाहिराती यांचे चित्रीकरण बंद राहील.
अत्यावश्यक सेवा न देणारी सर्व दुकाने, मॉल्स, शॉपिंग सेंटर्स बंद राहतील.
जिल्ह्यातील सर्व किनारे, बगीचे/उद्याने, सार्वजनिक मैदाने, खेळाची मैदाने, क्रिडांगणे, स्पोर्टस कॉम्प्लेक्स, योगा क्लासेस, जिम, व्यायामशाळा, जलतरण तलाव पुढील आदेशापर्यंत बंद राहतील. 

*धार्मिक स्थळे , प्रार्थनास्थळे:
सर्व धार्मिक स्थळे, प्रार्थनास्थळे बंद राहतील.
धार्मिक स्थळे/प्रार्थनास्थळे याठिकाणच्या व्यस्थापनामधील सेवेमध्ये सहभागी असलेल्या सर्व व्यक्तींना त्यांची सेवा (साफसफाई, नित्य पूजा, दिवाबत्ती, इ.) नेहमीप्रमाणे बजावता येईल. तथापि ,  भाविकांना धार्मिक स्थळे , प्रार्थनास्थळे याठिकाणी प्रवेशाची परवानगी असणार नाही.
धार्मिक स्थळे , प्रार्थनास्थळे याठिकाणच्या व्यवस्थापनामधील सर्व व्यक्तींनी भारत सरकारने निश्चित केलेल्या नियमांनुसार तात्काळ लसीकरण (Vaccination) करुन घ्यावे. 

*केशकर्तनालये, स्पा , सलून , ब्युटी पार्लर्स:
केशकर्तनालये , स्पा , सलून , ब्युटी पार्लर्स बंद राहतील. 
या आस्थापनांमध्ये काम करणारे सर्व कर्मचाऱ्यांनी  भारत सरकारने निश्चित केलेल्या नियमांनुसार तात्काळ लसीकरण (Vaccination) करुन घ्यावे. 

*शाळा व महाविद्यालये:
शाळा व महाविद्यालये बंद राहतील. तथापि , वैद्यकीय व निमवैद्यकीय (Medical & Paramedical) अभ्यासक्रमाची महाविद्यालये, नर्सिंग कॉलेजेस (सरकारी, खाजगी सर्व) ही अत्यावश्यक वैद्यकीय सेवा यामध्ये येत असल्याने ती चालू राहतील. 
इयत्ता दहावी व इयत्ता बारावीच्या परीक्षा घेण्यास परवानगी राहील. परीक्षा प्रक्रियेशी संबंधित सर्व कर्मचा-यांनी लसीकरण केलेले असणे किंवा 48 तासापर्यंत वैध असलेला निगेटिव्ह आरटीपीसीआर ,अँटीजेन अहवाल असणे बंधनकारक आहे.
राज्याबाहेरील बोर्ड, विद्यापीठ किंवा प्राधिकरणांकडून आयोजित केल्या जाणा-या ज्या परीक्षांना परवानगी नाकारल्यामुळे महाराष्ट्रात राहणा-या विद्यार्थ्यांचे नुकसान होईल अशा परीक्षांना आयोजित करण्यासाठी संबंधित विभागाने संबंधित आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाची परवानगी घेणे बंधनकारक राहील. 
ज्या विद्यार्थ्यांना परीक्षेकरीता प्रत्यक्षपणे संबंधित केंद्रावर प्रत्यक्ष उपस्थित राहणे आवश्यक आहे अशा विद्यार्थ्यांना व त्यांचेसमवेत एक प्रौढ व्यक्तीस त्यांचे घरापासून परीक्षाकेंद्रावर व तेथून घरी जाण्याकरिता त्यांचेकडील वैध परीक्षा प्रवेशपत्राचे आधारे संचार , प्रवास करण्याची परवानगी राहील.
सर्व प्रकारच्या खाजगी शिकवण्या, कोचिंग क्लासेस बंद राहतील.
या आस्थापनांमध्ये काम करणारे सर्व कर्मचारी यांनी भारत सरकारने निश्चित केलेल्या नियमांनुसार तात्काळ लसीकरण (Vaccination) करुन घ्यावे.

*धार्मिक, सामाजिक, राजकीय, सांस्कृतिक कार्यक्रम, मेळावे, सभा, संमेलने:
सर्व धार्मिक, सामाजिक, राजकीय, सांस्कृतिक कार्यक्रम, मेळावे, सभा, संमेलने यांना मनाई राहील.
मंगल कार्यालये, लॉन्स, फंक्शन हॉल्स बंद राहतील.
लग्न, विवाह समारंभामध्ये जास्तीत जास्त 25 व्यक्तींना उपस्थित राहण्याची परवानगी राहील.
धार्मिक स्थळे, प्रार्थनास्थळांच्या ठिकाणी लग्न आयोजित केलेले असल्यास कोविड-19 च्या प्रतिबंधात्मक उपाययोजनांचे काटेकोरपणे पालन करण्याच्या अटीवर परवानगी देण्यात येईल. 
अंत्यविधी, अंत्ययात्रांमध्ये जास्तीत जास्त 20 व्यक्तींना उपस्थित राहण्याची परवानगी राहील.
धार्मिक स्थळे , प्रार्थनास्थळांच्या ठिकाणी आयोजित करण्यात आलेल्या अंत्यविधी कार्यक्रमांना कोविड-19 च्या प्रतिबंधात्मक उपाययोजनांचे काटेकोरपणे पालन करण्याच्या अटीवर परवानगी देण्यात येईल.
*ऑक्सीजन उत्पादक:
ज्या औद्योगिक प्रक्रियेमध्ये ऑक्सीजनचा कच्चा माल म्हणून उपयोग करण्यात येतो त्या प्रक्रियेस मनाई राहील. अपवादात्मक परिस्थितीमध्ये अत्यावश्यक सेवांकरिता आवश्यक असलेल्या बाबींचे उत्पादन करण्यासाठी ही प्रक्रिया चालू ठेवणे आवश्यक असल्यास तशी लेखी कारणे नमूद करुन विकास आयुक्त (Development Commissioner) यांच्याकडे आवेदन करणे व त्यांची परवानगी घेणे आवश्यक राहील. 
सर्व ऑक्सीजन उत्पादन करणा-या उत्पादकांनी त्यांचेकडील (प्रत्यक्ष व उत्पादनक्षमता दोन्हीच्या)    ऑक्सीजनचा साठा सार्वजनिक आरोग्य विभागाने दिलेल्य निर्देशांनुसार वैद्यकीय व औषधी उत्पादनांकरिता राखीव ठेवावा. त्यांनी त्यांचे ग्राहकांची यादी जाहीर करावी. 

*ई-व्यापार (E-Commerce):
ई-व्यापारास फक्त या आदेशाच्या मुद्दा क्र. 2 मध्ये नमूद केलेल्या अत्यावश्यक वस्तू व सेवांसाठीच परवानगी राहील. 
घरपोच सेवा (Home Delivery) च्या प्रक्रियेमध्ये सहभागी असलेल्या सर्व व्यक्तींनी तसेच घरपोच सेवा (Home Delivery) च्या प्रक्रियेमध्ये सहभागी असलेल्या व्यक्तींशी प्रत्यक्ष संबंध येणा-या सर्व व्यक्तींनी भारत सरकारने निश्चित केलेल्या नियमांनुसार तात्काळ लसीकरण (Vaccination) करुन घ्यावे. तसेच ई-व्यापार सेवा देणारी जी संस्था Workplace Vaccination करिता भारत सरकारच्या निकषांनुसार पात्र आहे अशा संस्थांनी तात्काळ लसीकरण मोहिमेचे आयोजन करणे आवश्यक राहील. घरपोच सेवा (Home Delivery) च्या प्रक्रियेमध्ये सहभागी असलेल्या व्यक्तींशी प्रत्यक्ष संबंध न येणा-या सर्व व्यक्तींनी मुद्दा क्र. 5 (a) मध्ये कार्यालयांकरिता देण्यात आलेल्या शिस्तीचे पालन करावे.
एकापेक्षा जास्त कुटुंबे निवास करत असलेल्या इमारतीच्या प्रवेशद्वावरच घरपोच सेवा (Home delivery) देण्यात येईल व तेथून पुढील अंतर्गत ने-आण संबंधित इमारतीकरिता नियुक्त कर्मचा-यांकडून करण्यात येईल. याठिकाणी घरपोच सेवा (Home delivery) देणा-या व्यक्ती व इमारतीकरिता नियुक्त कर्मचारी यांनी कोविड-19 च्या प्रतिबंधात्मक उपाययोजनांचे काटेकोरपणे पालन करणे बंधनकारक आहे. 
घरपोच सेवेच्या (Home delivery) प्रक्रियेमध्ये कोविड-19 च्या प्रतिबंधात्मक उपाययोजनांचे उल्लंघन केल्याचे दिसून आल्यास 1000 रुपये  इतका दंड आकारण्यात येईल. अशा प्रकारचे वारंवार उल्लंघन आढळून आल्यास कोविड-19 जोपर्यंत साथरोग म्हणून अधिसूचित राहील तोपर्यंत संबंधित आस्थापना चालू ठेवण्याची परवानगी (Licenses or permissions) रद्द करण्यात येईल.

*सहकारी गृहनिर्माण संस्था (Cooperative Housing Societies):
ज्या सहकारी गृहनिर्माण संस्थेमध्ये पाच पेक्षा जास्त सक्रीय कोरोना रुग्ण असतील त्या ठिकाणास लघू प्रतिबंधित क्षेत्र (मायक्रो कंटेन्मेंट झोन) करण्यात येईल. याठिकाणी मायक्रो कंटेन्मेंट झोनकरिता निश्चित करण्यात आलेल्या प्रमाणित कार्यपद्धतीचे (SOP) काटेकोरपणे पालन करणे बंधनकारक राहील. 
या संस्थांनी त्यांचे प्रवेशद्वारासमोर , इमारतीबाहेर भेट देणा-या व्यक्तींच्या माहितीकरिता तसा सूचनाफलक लावावा व इमारतीमध्ये कोणत्याही व्यक्तींना प्रवेश करण्याची परवानगी देऊ नये. 
लघू प्रतिबंधित क्षेत्रासाठीचे सर्व प्रतिबंध जसे आत प्रवेश करणे व बाहेर जाण्याची मनाई आदीवर गृहनिर्माण संस्थेच्या व्यवस्थापनाने पर्यवेक्षण करावे.
याबाबत हलगर्जीपणा, कर्तव्यात कसूर केल्याचे दिसून आल्यास अथवा उल्लंघन आढळून आल्यास गृहनिर्माण संस्थेस प्रथम वेळी  10 हजार रुपये इतका दंड आकारण्यात येईल. त्यानंतर स्थानिक प्राधिकरणाने निश्चित केल्यानुसार जास्तीचा दंड आकारण्यात येईल.  ही दंडाची रक्कम गृहनिर्माण संस्थेमध्ये प्रमाणित कार्यपद्धतीच्या (SOP) अंमलबजावणीकरिता पर्यवेक्षकांची (Supervising personnel) नियुक्ती करण्यासाठी उपयोग केला जाईल. 
सर्व सहकारी गृह निर्माण संस्थांनी इमारतीमध्ये नियमितपणे येणा-या व्यक्तींनी त्यांचे भारत सरकारने निश्चित केलेल्या नियमांनुसार लसीकरण (Vaccination) होईपर्यंत त्यांची आरटीपीसीआर/अँटीजेन चाचणी केली असलेबाबत खात्री करावी. 

*बांधकाम क्षेत्र (Construction Activity):
ज्या ठिकाणी कामगारांना निवासाची सोय उपलब्ध आहे अशा ठिकाणच्या बांधकाम क्षेत्रास (Construction site) परवानगी राहील. साहित्याची ने-आण करण्याकरिता होणारी हालचाल (material movements) वगळता बांधकाम क्षेत्राचे ठिकाणी व त्याठिकाणाहून बाहेर होणारी हालचाल कठोरपणे टाळण्यात यावी. 
या प्रक्रियेमध्ये सहभागी असलेल्या सर्व व्यक्तींनी भारत सरकारने निश्चित केलेल्या नियमांनुसार तात्काळ लसीकरण (Vaccination) करुन घ्यावे व या बाबींशी संबंधित संस्थांनी भारत सरकारच्या निकषांनुसार तात्काळ लसीकरण मोहिमचे (workplace vaccination) आयोजन करावे. 
याबाबत हलगर्जीपणा, कर्तव्यात कसूर केल्याचे दिसून आल्यास अथवा उल्लंघन आढळून आल्यास बांधकाम क्षेत्राचे विकसकास (developer of the construction site) रु. 10,000/- इतका दंड आकारण्यात येईल तसेच वारंवार उल्लंघन केल्याचे आढळून आल्यास संबंधित बांधकाम क्षेत्र (construction site) कोविड-19 साथरोग म्हणून अधिसूचित असेपर्यंत बंद करण्यात येईल.
एखादा कर्मचारी, कामगार पॉझिटिव्ह आढळल्यास त्याला वैद्यकीय रजा मंजूर करण्यात यावी व या कारणामुळे त्याच्या अनुपस्थितीकरिता त्याला सेवेतून काढू नये. जर तो कर्मचारी कोरोना पॉझिटिव्ह आला नसता तर त्याने जे लाभ प्राप्त केले असते ते सर्व लाभ त्याला देण्यात यावेत.
आगामी पावसाळा ऋतुच्या अनुषंगाने सार्वजनिक सुरक्षा व बांधकामाची सुरक्षा (safety of the structures) या कारणाकरिता कोणत्याही बांधकामास परवानगी देण्याचा अधिकार स्थानिक प्राधिकरणास (Incident Commander तथा उपविभागीय अधिकारी) यांना राहील. 

*दंडात्मक तरतूदी:
  सर्व प्रकारच्या आकारण्यात आलेल्या दंडाची रक्कम कोविड-19 या आपत्तीचे चांगल्या प्रकारे 
व्यवस्थापन व उपचारासाठी वापर करण्याकरिता संबंधित आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाकडे जमा 
करण्यात येईल.
      हा आदेश महाराष्ट्र शासनाने ‘Break the Chain’ अंतर्गत यापूर्वी दिलेले आदेश , स्पष्टीकरण 
यांनुसार  जिल्हाधिकारी कार्यालयाने 7 एप्रिल 2021 रोजी निर्गमित केलेल्या आदेशांच्या अधीन आहे. ' ब्रेक द चैन ’ अंतर्गत यापूर्वी दि .10 मार्च 2021 , दि .5 एप्रिल 2021  , 6 एप्रिल 2021 आणि 7 एप्रिल 2021 रोजीच्या आदेशाअन्वये जिल्हाधिकारी  कार्यालयाने निर्गमित केलेल्या आदेश  लागू असतील .
  या आदेशाचे उल्लंघन करणारी व्यक्ती आपत्ती व्यवस्थापन अधिनियम 2005 चे कलम 51 ते 60 तसेच भारतीय दंड संहिता (45 ऑफ 1860) कलम 188 व इतर लागू होणा-या कायदेशीर तरतुदींनुसार दंडनिय/कायदेशीर कारवाईस पात्र राहील.
  या आदेशाची अंमलबजावणी दि .14 एप्रिल 2021 रोजी रात्री 8 पासून तात्काळ लागू 
    करण्यात येत आहे .तसेच हे   आदेश दि.  01 मे 2021 रोजी सकाळी 7  वाजेपर्यंत लागू राहतील .तसेच जिल्हाधिकारी कार्यालयाने यापूर्वी वेळोवेळी निर्गमित केलेले आदेश लागू राहतील ,असेही या आदेशात नमूद केले आहे .


                  *****

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा (0)
To Top