google.com, pub-1406548548385211, DIRECT, f08c47fec0942fa0 चला रक्ताचे नाते जोडूया : टाकळी(बें)येथे भव्य रक्तदान शिबीर संपन्न

चला रक्ताचे नाते जोडूया : टाकळी(बें)येथे भव्य रक्तदान शिबीर संपन्न

0
चला रक्ताचे नाते जोडूया
टाकळी(बें)येथे भव्य रक्तदान शिबीर संपन्न

कनगरा/प्रतिनिधी
               उस्मानाबाद तालुक्यातील टाकळी (बें) येथे राज्यासह जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात रक्ताचा तुटवडा भासत असल्याने सामाजिक बांधिलकीच्या भूमिकेतून रा.काॅ.पक्षाचे तालुकाध्यक्ष(ओबीसी सेल)तथा युवा पञकार प्रशांत सोनटक्के ,रा.काॅ.पक्षाचे तालुका युवक सरचिटणीस शिवशांत काकडे व सह्याद्री ब्लड बॅंक,उस्मानाबाद यांच्या सहकार्याने भव्य असे रक्तदान शिबीर पार पडले. रक्तदान,सर्वश्रेष्ट दान ही भावना जोपासत गावातील तरुणांनी शिबिरात उत्स्फुर्त प्रतिसाद नोंदवला होता.आपल्या रक्तदानाने अनेक रुग्णांचे प्राण वाचतील हा उदात्त हेतू डोळ्यासमोर ठेऊन गावातील तरुण युवकांनी रक्तदान करुन मोठे सामाजिक कार्य पार पाडले.
         सदर रक्तदान शिबीरात रक्तदान करणार्‍या रक्तदात्यांना बेंबळी पोलीस स्टेशनचे पोलीस कर्मचारी यांच्या हास्ते प्रमाणपञ व २ लिटरचा प्रेशर कुकर आयोजकांच्या वतीने भेट म्हणून देण्यात आला.
          यावेळी राजदीप जगताप,ज्योतिराम जाधव,कनगरा गावचे स्थानिक युवा पञकार अमोल गायकवाड,बेंबळी पो.स्टेशनचे  पोलीस कर्मचारी सचिन कपाळे,श्रीपाल सुर्यवंशी,पो.ह.पटेल,बेंबळी प्राथमिक आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी डाॅ.रोहित राठोड यांच्यासह गावातील युवकांची रक्तदान शिबीरास प्रमुख उपस्थिती होती.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा (0)
To Top