google.com, pub-1406548548385211, DIRECT, f08c47fec0942fa0 Osmanabad : जिल्ह्यात 72 तासात 72 रुग्णाचा मृत्यू !

Osmanabad : जिल्ह्यात 72 तासात 72 रुग्णाचा मृत्यू !

0



उस्मानाबाद ( Osmanabad 72 patients death in 72 hours in the district ) जिल्ह्यात मागील 72 तासात एकूण 72 रुग्ण मृत झाले आहेत. 20 एप्रिल रोजी 21 , 21 एप्रिल रोजी 23 व 22 एप्रिल रोजी 21 असे तीन दिवसांत कोरोनामुळे एकूण 65 व या व्यतिरिक्त सारी( ताप, खोकला, श्वास घेण्यात त्रास होणे ) व कोविड 19 रिपोर्ट NEGATIVE असलेल्या एकुण 7 रुग्णांचे मृत्यू झाले आहे. असे तीन दिवसांत एकुण 72 रुग्णाचा मृत्यू झाला आहे. 


उस्मानाबाद जिल्ह्यातील एकट्या उस्मानाबाद तालुक्यात कोरोणा मुळे तीन दिवसांत 46 मृत्यू झाले आहेत. त्यामध्ये 20 एप्रिल रोजी 12  , 21 एप्रिल रोजी 23 तर 22 एप्रिल रोजी 11 मृत्यू झाल्याची माहिती जिल्हा आरोग्य विभागाने रोज दिलेल्या माहिती वरून निदर्शनास येते.


उस्मानाबाद जिल्ह्यात कोरोनाने हाहाकार माजवला आहे.  जिल्ह्यात ऍक्टिव्ह रुग्णाची संख्या 6057 झाली आहे. जिल्ह्याचा मृत्यू दर 2.30 टक्के आहे . जिल्ह्याचा रिकव्हरी रेट 79.15 टक्के आहे. आजपर्यंत जिल्ह्यात एकुण 800 रुग्णांच्या मृत्यूची नोद झाली आहे. आंनादाची बाब म्हणजे आजपर्यंत 25 हजार 510 रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. 



उस्मानाबाद जिल्ह्यातील दररोजचे होणाऱ्या मृत्यूची संख्या पाहून लोक भयभीत होत आहेत.  ग्रामीण भागात लोक गाव सोडून शेताकडे राहण्यास जात आहेत. जिल्हा प्रशासन विविध उपयोजना राबवत आहे मात्र रुग्ण संख्येत वाढ होत आहे . जिल्हा रुग्णालयात अनेकवेळा आचानक बेड कमी पडत आहेत. त्यावेळी नाईलाजाने रुग्णांना मिळेल तशी व्यवस्था करून उपचार घ्यावे लागत आहे. त्यात जिल्हा आरोग्य यंत्रणा मनुष्य बळाने कमी पडत आहे . 


उस्मानाबाद जिल्ह्यातील ग्रामीण भागातील येणारे रुग्ण व त्यांचे नातेवाईक रुग्णांना एकदम शेवटच्या क्षणी रूग्णालयात दाखल करत आहेत त्यामुळे मृत्यूचे प्रमाण देखील वाढत आहेत व वयस्कर रूग्णाना गंभीर परिस्थिती दाखल केल्याने पाणी व जेवणाची मोठी अडचण होत आहे.  भितीने नातेवाईक वयस्कर रुग्णांना सोडून रुगणाल्याच्या बाहेर जात आहेत रुग्णांना स्टिटर , वार्ड बाय देख रेख करत आहेत. त्यात जर एकदा अतीगंभीर परिस्थितीतील दुसरा रुग्ण दाखल झाला तर अवघड होत आहे. रुग्ण पाणी जेवन न केल्याने देखील मृत्यू होत असतील असे वाटते !

गंभीर परिस्थिती दाखल झालेल्या रुग्णांच्या नातेवाईकांनी न घाबरत सुरक्षितता बाळगत आपल्या रुग्णांची काळजी घेणे गरजेचे आहे. किमान दोन वेळा जेवण व किमान  दिवसभरात 3 लिटर पाणी पाजावे व रुग्णांना समोर राहुन धीर द्यावा.  काही दिवस विलगीकरणात राहुन आपली व आपल्या परिवाराची काळजी घ्यावी . रुग्णालयात डॉक्टर , सिस्टर , वॉर्डबॉय यांना सहकार्य करावे .वर्षभर पेक्षा जास्त काळ झाला आहे डॉक्टर , सिस्टर , वॉर्डबॉय रुग्णांना वाचविण्यासाठी मोठे शर्तीचे प्रयत्न करत आहेत. सलाम त्या योध्यांना..!



टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा (0)
To Top