पोलीस , महसूल, नगरपंचायत आरोग्य,प्रशासनाची संयुक्त फेरी
लोहारा / प्रतिनिधी
कोरोना साथिमुळे जीवनावश्यक वस्तूची दुकाने सकाळी ७ ते ११ या वेळेत उघडी ठेवण्यास प्रशासनाची परवानगी आहे, या निबंधाचे योग्य पालन व्हावे यासाठी पोलीस, महसूल,नगरपंचायत, आरोग्य विभागाच्या वतीने तिन्ही विभागाचे अधिकारी, कर्मचारी मिळून शहरातील जगदंबा मंदिर ते छत्रपती शिवाजी महाराज चौक डॉ बाबासाहेब आंबेडकर चौकात सकाळी १० वाजता फेरी काडून जनजागृती करीत करून फेरी दरम्यान पोलीस वाहनावरील ध्वनीशेपकावर कोव्हीड-१९ बदल जनजागृती व सहकार्याचे आव्हान केले आहे, तसेच संबंधित दुकाने भाजी पाला दुकाने ११ वाजता बंद होतील याची खात्री करून त्यानंतर चौका चौकात खडा पहारा देऊन मनाई आदेशाची पालनावर देखरेख केली जात आहे दि २३ एप्रिल रोजी लोहारा शहरात काढण्यात आलेल्या फेरीत पोलीस निरीक्षक श्री धरमसिंग चव्हाण,उपनिरीक्षक व्ही बी कदम, नगरपंचायत मुख्याधिकारी गजानन शिंदे,नायबतहसीलदार शिराळकर, नवनाथ लोहार, बाळू सातपुते, गणेश काडगावे,शिरशल मिटकरी, अनिल बोडमवाड, सदाशिव पांचाळ,प्रवीण नळेगावकर,किशोर शेवाळे,हनुमंत पापुलवर,विठ्ठल गरड, विजय कोळी व होमगार्ड आदींचा समावेश होता,