google.com, pub-1406548548385211, DIRECT, f08c47fec0942fa0 उस्मानाबाद जिल्हा पोलीस दलातर्फे इ-पास सुविधा सुरू - Osmanabad District Police e-pass facility launched.

उस्मानाबाद जिल्हा पोलीस दलातर्फे इ-पास सुविधा सुरू - Osmanabad District Police e-pass facility launched.

0

उस्मानाबाद जिल्हा पोलीस दलातर्फे  इ-पास सुविधा सुरू. ( Osmanabad District Police e-pass facility launched )

Osmanabad : (शुक्रवार दि. २३/४/२०२१)

कोविड-१९ च्या साथीमुळे प्रशासनाच्या आदेशाने उस्मानाबाद जिल्ह्याच्या सर्व आंतरजिल्हा सीमा व आंतरराज्य सीमा शुक्रवार दि. २३/४/२०२१ पासून प्रवासास बंद करण्यात आल्या असून त्या सर्व सीमांवर पोलीस तपासणी नाके कार्यरत करण्यात आले आहेत.
   या सीमा फक्त अत्यावश्यक कारणांस्तव ओलांडता येतील. परंतु अशा प्रकरणांत त्या सीमा ओलांडण्यास (प्रवास) 'इ-पास' बंधनकारक असून ही इ- पास सुविधा महाराष्ट्र पोलीस दलाच्या ➡️ 
⬅️ 
 या संकेत स्थळावर / लिंकवर उपलब्ध आहे. 
     गरजु अर्जदारांनी या लिंक वर जाऊन योग्य तो जिल्हा निवडावा. 

   अर्जदाराने आपले नाव व ओळखपत्र, पत्ता इ मेल आयडी, वाहन प्रकार व क्रमांक, प्रवासी संख्या, प्रवास उद्देश, प्रवास प्रारंभ ठिकाण, प्रवासाचे अंतिम ठिकाण, प्रवास मार्ग व दिनांक, परतीचा प्रवास मार्ग व दिनांक इत्यादी माहिती त्यात भरावी. 
    तसेच अर्जदाराचे छायाचित्र (२०० kb आकाराच्या आतील) व आवश्यक कागदपत्रे (प्रत्येकी १ mb आकाराच्या आतील) इत्यादी माहिती भरून, अपलोड करून तसा ऑनलाईन अर्ज महाराष्ट्रातील संबंधीत जिल्हा पोलीस दलास / पोलीस आयुकतालयास करावा.

  त्या ऑनलाईन अर्जातील माहिती सत्यता, प्रवासाचा अत्यावश्यक उद्देश व निकड पाहून फक्त मर्यादित प्रकरणांत संबंधित पोलीस दलातर्फे इ -पास मंजूर केला जाईल. तर अनावश्यक, गौण कारणास्तव केलेले अर्ज नाकारले जातील.

    ऑनलाईन अर्जदारांना तसा इ-पास मंजूर झाल्यास अर्जदारांनी त्या इ-पासची इलेक्ट्रॉनिक / छापील प्रत सोबत बाळगून इ-पास मधील अटी, शर्ती तसेच कोविड-१९ संबंधी मनाई आदेशांचे पालन करून या आंतरजिल्हा / आंतरराज्य सीमा ओलांडाव्यात. अशी माहिती पोलिस प्रशासनाने दिली आहे. 

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा (0)
To Top