बनावट नोटा चलनात आननाऱ्यास कळंब पोलीसांनी घातल्या बेड्या, बनवट नोटा रॅकेट समोर येण्याची शक्यता

0
बनावट नोटा चलनात आननाऱ्यास कळंब पोलीसांनी घातल्या बेड्या, बनवट नोटा रॅकेट समोर येण्याची शक्यता  

 कळंब : -  हि उस्मानाबाद जिल्ह्य़ातील मोठी बाजार पेठ असुन  शहरात बनावट नोटांचे रॅकेट गेल्या अनेक दिवसापासुन चालु होते, पाचशे तसेच दोनशे रूपयांचे बनावट चलन बाजारात आढळू लागल्याने  व्यापारी व ग्राहक हैराण झाले होते . एका व्यापाऱ्याने कळंब चे पोलीस निरिक्षक तानाजी दराडे यांना गुप्त माहिती देऊन बनावट नोटा बाजारात चलनात आल्याचे गेल्या चार पाच दिवसापुर्वीच सांगीतले होते.पोलीसांनी सापळा रचुन शुक्रवारी मध्यरात्री पोलीस निरिक्षक तानाजी दराडे पोलीस कॉन्स्टेबल शिवाजी राऊत, हांगे एस एल, अमोल जाधव, सुनिल कोळेकर , रेखा काळे ,यांनी आरोप असरफअली तायरअली सय्यद (वय २५ बाबा नगर कळंब ) या आरोपीला पळुन जात असताना शहरात पकडले व त्याची झडती घेतली असता त्याच्याकडे ५००रु च्या 3 व 2००रु पाच बनावट  नोटा मिळाल्या आहेत. पोलीसांनी घराची झडती घेतली असता आणखी पाचशे व दोनशेच्या बनावट नोटा पोलीसांना मिळाल्या असुन कळंब पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.
या बनावट नोटा चलनात अननारे रॅकेटचे धागेदोरे शोधण्यात पोलीसांना यश आले असेल तरी माञ यातील मुख्य सुञधार पोलीसांच्या हाती अद्याप लागला नाही . या रॅकेटचे लातुर जिल्ह्याशी कनेक्शन असुन मुख्य आरोपीला पकडणे पोलिसांसमोर मोठे आव्हान उभे टाकले आहे. पुढील तपास कळंब पोलीस निरीक्षक तानाजी दराडे करत आहेत...

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा (0)
To Top