क्रेडीट कार्डचा विमा काढण्याच्या बहाण्याने 70,725 हजाराची फसवणूक
उस्मानाबाद , येरमाळा: अनिल गंगाधर चौधरी, रा. पानगांव, ता. कळंब यांच्या भ्रमणध्वनीवर 01 एप्रील रोजी दुपारी एका महिलेने कॉल करुन क्रेडीट कार्डचा विमा काढण्याच्या बहाण्याने चौधरी यांना क्रेडीट कार्ड क्रमांक व पासवर्ड विचारले. यावर अनिल चौधरी यांनी त्या महिलेस तशी माहिती सांगीतली असता त्यांच्या भ्रमणध्वनीवर दोन वेळा गोपनीय ओटीपीचे संदेश आले. ते ओटीपी संदेश वाचून समजून न घेता चौधरी यांनी निष्काळजीपणा दर्शवून त्या महिलेस ओटीपी सांगीतले. यावर त्यांच्या बँक खात्यातून अनुक्रमे 50,225 ₹ व 20,500 ₹ असे दोन व्यवहारात एकुण 70,725 ₹ रक्कम अन्यत्र स्थलांतरीत झाली. अशा मजकुराच्या अनिल चौधरी यांनी 02 एप्रील रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन भा.दं.सं. कलम- 419, 420 सह माहिती तंत्रज्ञान कायदा कलम- 66 (सी) (डी) अंतर्गत गुन्हा नोंदवला आहे.