लोहारा खु येथे युवकांच्या लोकसहभागातून ४० हजारांचे स्टीमर चे वाटप
लोहारा / प्रतिनिधी
कोरोना महामारी च्या संकटापासुन सुरक्षित राहण्यासाठी व आरोग्याची काळजी घेण्यासाठी गावातील गरजू ३०० कुटुंबांना स्टीमरचे वाटप करण्यात आले.
मंगळवारी हा कार्यक्रम राममंदिर परिसरात घेण्यात आला. या कार्यक्रमासाठी लोहारा पंचायत समितीचे गटविकास अधिकारी मा.एस.ए.अकेले , सरपंच सचिन रसाळ, सहायक निळकंठ पाटील ग्रामसेवक कोकाटे जी डी, पोलिस पाटील बीरूदेव सुर्यवंशी, विकास सोसायटी चे चेअरमन मुकुंद इंगळे माजी चेअरमन भास्कर रसाळ व राष्ट्रवादी काँग्रेस चे लोहारा तालुका अध्यक्ष श्री सुनील साळुंखे यांची उपस्थिती होती.
लोकसहभाग व नाविन्यपुर्ण संकल्पनेतून मदत करण्याचे आवाहन बालाजी सूर्यवंशी यानी तरुणांना केले. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी नारायण सुर्यवंशी, अजय रसाळ, सचिन बाळू रसाळ, खंडेराव मुरटे, सुग्रीव पाटील, विकास प्रकाश पाटील यांच्यासह स्वप्नपुर्ती समूहचे अरविंद रसाळ, श्रीहरी रसाळ, राजमुद्रा समुहचे अर्जुन रसाळ, हणमंत मुरटे,अजय रसाळ,रोहण जमादार, व सह्याद्री समुहाचे भास्कर रसाळ, गणेश पाटील यानी पुढाकार घेतला. लोकसहभागातुन नितिन सूर्यवंशी, खंडू आरगड़े,व्यंकटेश सूर्यवंशी, प्रकाश हरिश्चंद्र रसाळ, नरहरी पाटील, प्रल्हाद रसाळ, शिवाजी पाटील, शिवाजी रसाळ, बालाजी पाटील, शिवशंकर लोखंडे,अमर जाधव, आप्पाराव सुर्यवंशी आदींनी विशेष सहकार्य केले.