Osmanabad सही साठी 5 हजाराची लाचेची मागणी ; महिला सरपंचासह पतीलाही लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने रंगेहात पकडले ! 5 thousand bribe for signature

0
Osmanabad सही साठी 5 हजाराची लाचेची मागणी ; महिला सरपंचासह पतीलाही लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने रंगेहात पकडले ! 

उस्मानाबाद ( Osmanabadnews.in ) :- 

 तक्रारदार पुरुष,वय 26 वर्षे यांनी उस्मानाबाद लाचलुचपत प्रतिबंधक विभागात तक्रार केली होती लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने सापळा रचुन आरोपी 1) विश्वनाथ गोविंद कांबळे (खाजगी इसम- सरपंच महिलेचा पती ) 2) शशिकला विश्वनाथ कांबळे ( सरपंच – मेन्ढा ता.जि.उस्मानाबाद) दोघे रा.मेन्ढा ता.जि.उस्मानाबाद यांनी 
लाचेची मागणी 5000/- रुपये रक्कम लाचेची मागणी दिनांक 10.05.2021 

तक्रारदार यांच्या मेन्ढा गावचे हद्दीत गट क्रमांक 308 मध्ये एक एकर क्षेत्रात शासनाचे फळबाग योजनेतून लावलेल्या शेवग्याच्या मशागतीकरीता रोजगार मागणी अर्जावर महिला सरपंच ( आरोपी क्र.2) यांची सही घेण्यासाठी त्यांचा पती आरोपी क्र.1 यांची दि.10/5/2021रोजी 09.15 ते 10.22 वा.दरम्यान त्यांच्या घरी भेट घेतली असता त्यांनी पुर्वीच्या पाच मस्टरचे प्रत्येकी 1000/- रुपये प्रमाणे एकुण 5000/- रुपये लाचेची मागणी पंच साक्षिदारा समक्ष केली व आरोपी क्र.2 यानी आरोपी क्र.1 च्या मार्फत लाचेची मागणी करुन लाच रक्कम मागण्यास प्रोत्साहन दिले. याचे हॅश व्हॅल्यू घेण्यात आली आहे. सापळा अधिकारी प्रशांत संपते,पोलीस उप अधिक्षक ला.प्र.वि.उस्मानाबाद यांनी मार्गदर्शक मा. डॉ राहुल खाडे,पोलीस अधीक्षक मा.मारुती पंडीत, प्रभारी अपर पोलीस अधीक्षक, ला.प्र.वि. औरंगाबाद यांच्या मार्गदर्शन खाली सापळा पथक पो.ह.दिनकर उगलमुगले, इफ्तेकार शेख, पो.ना.पांडूरंग डंबरे,पो.का.विष्णू बेळे,अविनाश आचार्य व चालक पो.ना.करडे यांनी हि कारवाई पार पाडली. पो.स्टे.बेंबळी येथे गुन्हा नोंद करण्याची प्रक्रिया चालू आहे, आरोपी अटक नाहीत. अशी माहिती लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने दिली आहे. 

शासकीय काम करून देण्यासाठी कोणी लाचेची मागणी करत असेल तर त्यांनी तात्काळ लाचलुचपत प्रतिबंधक विभाग उस्मानाबाद येथे संपर्क साधावा असे आवाहन अधिकारी प्रशांत संपते, पोलीस उप अधिक्षक ला.प्र.वि.उस्मानाबाद यांनी केले आहे .

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा (0)
To Top